Amalner

Amalner: खा शि निवडणूक…अवैध बॅनर प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल..

Amalner: खा शि निवडणूक…अवैध बॅनर प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल..

अमळनेर येथे सध्या खा शि संस्थेची निवडणूक सुरू असून उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पाश्र्वभूमीवर आज अमळनेर नगरपरिषद कर्मचारी व पोलीस प्रशासनाने निवडणूक प्रचाराचे अवैध बॅनर पूर्व परवानगी न घेता व नेमून दिलेल्या ठिकाणी न लावल्यामुळे दोन जणांवर महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन.१९९५ प्रमाणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर न प चे कर्मचारी व अमळनेर पोलिस यांच्या संयुक्त पथकाने ही कार्यवाही केली आहे. वरील पथक शहराचे गस्त घालत असताना भारतीय स्टेट बँक पासुन ते प्रताप कॉलेज पावेतो असे एकुण ०३ बैनर खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीचे प्राचारार्थ लावण्यात आलेले दिसले. व त्यावर निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांचे नावे, चिन्हे
इ.मजकुर व त्याच्या एका बाजुस वर्धमान डिजीटल मो.क्र.९४२२०३३००३ असे नमुद होते. सदरचे बँनराहोर्डिंग हे नगरपरीषद अमळनेर यांनी सर्वानुमते ठराव करन मंजुर केलेल्या ठिकाणावर लावण्यात आलेले नव्हते. तसेच नगरपरीषद
अमळनेर यांची कुठलीही परवानगी प्राप्त करुन लावण्यात आलेले नसल्याने सदरचे बँनर आमच्या सह असलेल्या वर नमुद पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेतले असुन वर्धमान डिजीटल यांच्या बाबत अधिक माहीती घेतली
असता त्याचे मालक कुमारपाल घेवरचंद कोठारी रा.अमळनेर असे असल्याचे समजुन आले.

त्यानंतर भद्रा प्रतिक मॉल ते रेल्वे उडाण पुला पावेतो खान्देश शिक्षण मंडळ
निवडणुकीचे प्राचारार्थ लावण्यात आलेले एकुण ०३ बैनर दिसले व त्यावर निवडणुक लढवित असलेल्या उमेदवारांचे नावे, चिन्हे इ.मजकुर त्याच्या एका बाजुस राजकुमार मो.क्र.९५१९८२००२१ असे नमुद होते. सदरचे बॅनराहोडींग हे
नगरपरीषद अमळनेर यांनी सर्वानुमते ठाराव करुन मंजुर केलेल्या ठिकाणावर लावण्यात आलेले नव्हते. तसेच नगरपरीषद अमळनेर यांची कुठलीही परवानगी प्राप्त करुन लावण्यात आलेले नसल्याने सदरचे बॅनर आमच्या सह असलेल्या वर
नमुद पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेतले असुन राजकुमार यांच्या बाबत अधिक माहीती घेतली असता त्याचे मालक प्रविण श्रीराम पाटील रा.तांबेपुरा अमळनेर हे असल्याचे समजुन आले असुन वरील दोन्ही नमुद इसमांनी
खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीचे प्राचारार्थ अवैध होडौंग बॅनर लावुन शहराच्या विद्रुपी करणात भर पाडली आहे.

तरी आज दि.१२/०२/२०२२ रोजी ११.३० ते १४.३० वाजेदरम्यान अमळनेर शहरातील भारतीय स्टॅट बँक ते प्रताप कॉलेज पावेतो वर्षमान डिजीटल यांच्या मालक कुमारपाल घेवरचंद कोठारी रा.अमळनेर तसेच भद्रा प्रतिक मौल ते
रेल्वे उड्डाण पुला पावेतो राजकुमार यांच्या मालक प्रविण श्रीराम पाटील रा.तांबेपुरा अमळनेर यांनी नगरपरीषद अमळनेर यांनी सर्वानुमते ठराव करुन मंजुर केलेल्या ठिकाणावर बँनराहोडीग न लावता तसेच कोणातेही पुर्व परवानगी प्राप्त न
करता खान्देश शिक्षण मंडळ निवडणुकीचे प्राचारार्थ अवैधालोडीग बॅनर लावुन शहराच्या विद्रुपी करणात भर पडली म्हणून त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र विद्रुपीकरण अधिनियम सन.१९९५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button