Amalner

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक..!तालुक्यात लहान मुले आढळून आली कोरोना बाधित..!चिंतेचे वातावरण..!

?️अमळनेर कट्टा..धक्कादायक..!तालुक्यात लहान मुले आढळून आली कोरोना बाधित..!चिंतेचे वातावरण..!

अमळनेर तालुक्यात लहान मुले कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर प्रशासन देखील चिंतेत पडले आहे.तालुक्यातील फक्त १५ महिन्याचा आणि ९ वर्षाचा मुलगा कोरोनाबाधित आढळून आले आहेत . यामुळे आरोग्य यंत्रणाही हादरली आहे तर पालकही चिंताग्रस्त झाले आहेत.

हे दोन्ही मुले शहारतील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.सुरुवातीला अँटीजेन चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली आहे. सदर मुलांचे पालक व त्यांचे कुटुंबीय आरटीपीसीआर चाचणीत निगेटिव्ह आले आहेत. एक कुटुंब मालेगाव येथे तर दुसरे कुटुंब अंत्यविधी ला गेले होते असे समजले आहे. यामुळे मुलांना कोरोना झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button