Amalner

?️अमळनेर कट्टा… Breaking..लाच घेताना रंगेहाथ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दोन कर्मचारी ताब्यात…

?️अमळनेर कट्टा… Breaking..लाच घेताना रंगेहाथ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दोन कर्मचारी ताब्यात…

अमळनेर येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना अँटी करप्शन ब्युरो नर रंगेहाथ पकडले असून आरोपीना ताब्यात घेण्यात आले आहे.

तक्रारदार- पुरुष,वय-35, रा.खेडी प्र.अ ता.अमळनेर, जि.जळगाव.
आरोपी-१) अरूण जगन्नाथ चव्हाण, वय-५७, व्यवसाय- कनिष्ठ अभियंता, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.मराठा कॉलनी,अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव.
वर्ग-३.
२) योगेश बापू बोरसे, वय-४२, व्यवसाय- वरीष्ठ सहाय्यक, जिल्हा परीषद बांधकाम विभाग,उपविभाग अमळनेर रा.प्रताप मिल, कंपाऊंड, अमळनेर ता.अमळनेर जि.जळगाव.
वर्ग-३.
लाचेची मागणी-आरोपी क्रं.१) 20,000/-रू.
आरोपी क्रं.२) 1,500/-रू.लाच स्विकारली-
आरोपी क्रं.१) 20,000/-रू.
आरोपी क्रं.२) 1,500/-रू

हस्तगत रक्कम-
आरोपी क्रं.१) 20,000/-रू.
आरोपी क्रं.२) 1,500/-रू.
लाचेची मागणी – ता.22/04/2021
लाच स्विकारली – ता. 22/04/2021

लाचेचे कारण
तक्रारदार यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधकामचे बिल मंजुर करण्यासाठी आरोपी क्रं.१ यांनी पंचासमक्ष 20,000/-₹ व आरोपी क्रं.२ यांनी सदर बिल तयार करण्यासाठी पंचासमक्ष 1,500/-₹ लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम मागणीप्रमाणे आरोपी क्रं.१ व २ यांनी पंचासमक्ष जिल्हा परीषद बांधकाम विभाग, उपविभाग अमळनेर येथील कार्यालयात स्वीकारली.
हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

सापळा व मदत पथक-
PI. निलेश लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ.
मा.श्री. सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा.श्री. निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा.श्री.विजय जाधव सो,पोलीस उपअधीक्षक, वाचक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,मा.श्री.गोपाल ठाकुर सो,पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि, जळगाव.
आरोपीचे सक्षम अधिकारी-
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परीषद,जळगाव.यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यवाही करण्यात आली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477
@ मोबा.क्रं. 9607556556

?️अमळनेर कट्टा... Breaking..लाच घेताना रंगेहाथ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दोन कर्मचारी ताब्यात...

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button