Amalner

भिम आर्मी अमळनेर तालुका अध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे तर शहराध्यक्ष पदी कृष्णकांत शिरसाठ

?️ अमळनेर कट्टा..भिम आर्मी अमळनेर तालुका अध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे तर शहराध्यक्ष पदी कृष्णकांत शिरसाठ

अमळनेर : भिम आर्मी च्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी प्रवीण बैसाणे तर शहराध्यक्ष पदी कृष्णकांत शिरसाठ यांची नुकतीच निवड झाली. भुसावळ येथे एका कार्यक्रमाप्रसंगी त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. बैसाणे व शिरसाठ यांनी महाविद्यालयीन काळापासूनच समाज कार्य केले. विविध संघटनांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना व युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कार्यामुळे भिम आर्मीने त्यांना ही जबाबदारी दिली. भिम आर्मीच्या माध्यमातून आम्ही समाजाला न्याय देऊ असे त्यांनी म्हटले आहे.

सदर कार्यक्रम प्रसंगी, “भिम आर्मी” महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, राज्य प्रवक्ते रमाकांत तायडे, महा.राज्य सचिव सूपडू संदानशिव , जिल्हा प्रमुख गणेश सपकाळे,जळगांव जिल्हा महासचिव श्रीकांत वानखेडे, जळगांव जिल्हा मुख्य संघटक विक्रम प्रधान, जिल्हा संघटक डॉली वानखेडे, जिल्हा सहसंघटक योगेश भालेराव, जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रबुद्ध खरे,भुसावळ तालुका प्रमुख विकास वलकर, यावल तालुका प्रमुख हेमराज तायडे, बोदवड तालुका प्रमुख सनी इंगळे, भडगाव तालुका प्रमुख डॉ.शेख, भुसावळ तालुका कामगार युनिट प्रमुख शकील शेख अमळनेरचे बाळासाहेब सोनावणे, भूपेंद्र शिरसाठ, आत्माराम अहिरे व जळगांव जिल्ह्यातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button