Mumbai

5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणार्यां नराधामांना फाशी द्या: आदि. सुनिता गेंगजे

5 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार करून निर्घृण हत्या करणार्यां नराधामांना फाशी द्या: आदि. सुनिता गेंगजे

पी व्ही आनंद मुंबई

मुंबई : 5 वर्षाच्या चिमुकली वर बलात्कार करून निर्घृण हत्या करणार्यां नराधामांना फाशी द्या, अशी मागणी बिरसा क्रांती दलाच्या मुंबई शहर व मुंबई उपनगर महिला जिल्हाध्यक्षा आदि.सुनिता गेंगजे यांनी वरिष्ठ पोलिस ठाणे घाटकोपर मुंबई येथे निवेदन देऊन केली आहे. सदर निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, पोलीस महासंचालक मुंबई, पोलीस अधिक्षक नांदेड यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी गावातील मन्नेरवारलू जमातीच्या 5 वर्षाच्या चिमुरडीचा बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. या घटनेतील मुख्य आरोपी फरार आहे,संशयित एक आरोपीला अटक करण्यात आली आहे.
उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय भोकर येथे पोस्ट मोर्टम साठी बॉडी आणली असता,संबंधित भोकर येथील डॉक्टर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात IN कॅमेरा पोस्ट मोर्टम करण्यासाठी घेऊन जावं अशी विनंती गावकऱ्यांना केली आहे,इतकी भयंकर घटना होऊन सुद्धा,घटनास्थळी एकही वरिष्ठ अधिकारी भेट दिली नाही किंवा बॉडी सोबत एक ही वरीष्ठ अधिकारी नाही, फक्त एक कॉन्स्टेबलला बाॅडी सोबत ठेवन्यात आलं आहे. माणूसकीला काळीमा फासणाऱ्या चिमुकलीच्या बलात्कार प्रकरणाकडे विशेष लक्ष घालून आरोपीला ताबडतोब पकडून,महाविकास आघाडीच्या पुरोगामी शासनानी अनु घातलेल्या स्त्री शक्ती कायद्यातर्गत फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल. याची नोंद घ्यावी, अशी मागणी सुनिता गेंगजे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button