Amalner

?️अमळनेर कट्टा..आणि “ती” भर रस्त्यात बंद पडते तेंव्हा…! ग्रामीण रूग्णालय आणि डॉ प्रमाणेच 108 कोमात..!

?️अमळनेर कट्टा..आणि “ती” भर रस्त्यात बंद पडते तेंव्हा…! ग्रामीण रूग्णालय आणि डॉ प्रमाणेच 108 कोमात..!

अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी उपयोगात येणारी रुग्ण वाहिकाच जेंव्हा धक्का मारून सुरू करावी लागते अशी विदारक परिस्थिती अमळनेर च्या रुग्णवाहिकेची झाली आहे.
अनेकांचे जीव वाचविणारी आणि वेळेवर उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक असणारी 108 नंबरची रुग्णवाहिकाच सध्या कोमात असल्याचे चित्र दिसून आले आहे. 108 नं कॉल करून तातडीने प्राथमिक उपचार मिळून देणाऱ्या रुग्णवाहिका रुग्णांसाठी महत्वपुर्ण आहेत . स्वतःच आजारी असलेल्या रुग्ण वाहिकेतून रुग्ण वेळेवर पोहचेल का? रुग्णाला जीवदान मिळेल का ? असे अनेक प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केले जात आहेत. कारण, अनेक गरजू लोकांना मदत करणारी ही रुग्णवाहिकाच सध्या कोमात गेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

आज ह्या रुग्णवाहिकेला धक्का देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला गेला.भर रस्त्यात बंद पडलेल्या ह्या रुग्ण वाहिके मुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ग्रामीण रुग्णालय प्रशासन आणि त्यांच्या कार्य पद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button