Amalner

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा रंगला खो खो…!आज तू.. कल मैं..परसों परत..? तू..

?️ अमळनेर कट्टा…अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाचा रंगला खो खो…!आज तू.. कल मैं..परसों परत..? तू..

अमळनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतील सभापती पद घेण्यावरून आणि देण्यावरून वाद सुरू आहे.फक्त सभापती पदाचाच नव्हे तर कै उदय बापू यांच्या फोटो वरून ही चांगलेच वादंग माजले आहे.5 ते 6 दिवसांपूर्वी अशासकीय सभापती तिलोतमा पाटील यांनी पदभार हाती घेतला. त्यानंतर दोनच दिवसांत माजी सभापती प्रफुल्ल पवार यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पदभार हाती घेतला.आज पुन्हा माजी सभापती प्रफुल्ल पवार व बाजार समिती अशासकीय मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील हे दोघेही आज बाजार समितीत आले. उच्च न्यायालयाने निकाल दिला असला तरी योग्य ती प्रशासकीय कार्य पद्धती पूर्ण न करता माजी सभापती यांनी पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समिती त येत पदभार कसा काय घेतला? असा प्रश्न सभापती तिलोतमा पाटील यांनी उपस्थित केला आहे. योग्य ती प्रोसिजर पूर्ण करून तसेच शासकीय आदेश आल्यानंतर पदभार स्विकारणे किंवा सोडणे योग्य ठरेल असे ही त्या म्हणाल्या.मला DDR कडून पद सोडण्यासंदर्भात कोणतेही पत्र नाही म्हणून मी अजून पदावर आहे. असेही मत त्यांनी व्यक्त केले आहे.

माजी सभापती प्रफुल्ल पवार यांनी देखील तात्पुरत्या स्वरूपात माघार घेतली आहे.

तर मुख्य प्रशासक व इतर लोकं हे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अपमान करीत आहेत. आम्ही चार्ज घेण्यासाठी गेलो असता आम्हाला संबंधितांनी चार्ज दिला नाही. त्यांनी आम्हाला लेखी द्यावी. आम्ही न्यायालयात पुन्हा दाद मागू…असे मत माजी सभापती प्रफुल्ल पवार यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान पुढील कार्यवाहीसाठी ते जळगांव येथे गेल्याची माहिती मिळाली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button