Amalner

?️अमळनेर कट्टा…कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बदलले..?फोटो  राजकारण..!आणि सत्ता पलट…चर्चेला उधाण..!

?️अमळनेर कट्टा…कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बदलले..?फोटो राजकारण..!आणि सत्ता पलट…चर्चेला उधाण..!

अमळनेर बाजार समितीत नुकतेच नेमले गेलेल्या प्रशासकीय संचालक बदलले असून आज दुपारी नवीन प्रशासक मंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीत पदभार स्वीकारला आहे. उच्च न्यायालयाने प्रशासक मंडळ संदर्भात आदेश जारी केले आहे.

शासनाच्या आदेशाने अमळनेर बाजार समितीत नवे कार्यकारी मंडळ (प्रशासक?) गेल्या काही दिवसांत बसविण्यात आले होते. मोठा गाजा वाजा करत पद ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. याप्रसंगी माजी सभापती दिवंगत उदय वाघ यांचा फोटो काढून टाकण्यात आला होता.या मुद्द्यावर संपूर्ण तालुक्यात राजकीय धुळवड उठली होती.एक मेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले होते.

परंतु आज शासनाने नेमलेले प्रशासकीय मंडळ बेकायदेशीर ठरवून उच्च न्यायालयाने पुन्हा जुन्या मंडळास पदभार दिला आहे.आज माजी आमदार स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत प्रफुल्ल पवार यांनी पदभार हाती घेतला.सप्टेंबर 2020 मध्ये पदभार सोडल्या नंतर सदर मंडळाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. जिल्ह्यात 8 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुदती संपल्या होत्या.8 पैकी 4 कृषी उत्पन्न बाजार समित्यांना मुदत वाढ दिली होती तर 4 बाजार समिती बाकी होत्या.या वर दाखल करण्यात आलेल्या याचिकेला निकाल देत जुन्याच मंडळ ला पदभार स्विकारण्याचे आदेश दिले आहेत.

यासंदर्भात प्रफुल्ल पवार यांनी प्रतिक्रिया देत सत्याचा विजय झाला असून उच्च न्यायालयावर आमचा विश्वास होता.न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आम्ही पदभार स्विकारला आहे.कोणतीही टेक्निकल अडचण नाही.

तर 15 दिवसांपूर्वी सभापती झालेल्या तिलोतमा पाटील यांनी म्हटले आहे की कोणताही शासकीय आदेश किंवा पत्र नसताना समोरील लोकांनी पदभार हाती घेतला आहे.

वाघांचा फोटो काढून टाकत गलिच्छ राजकारणाची झलक दाखवली होती. अमळनेर शहराला एक उत्कृष्ट सांस्कृतिक, राजकीय वारसा आहे.सध्या अमळनेर शहरातील वातावरण मात्र खराब झाले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button