Amalner

?️अमळनेर कट्टा..मांडळ,ता अमळनेर येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्ररकणी मारवड पो ठाण्यात गुन्हा दाखल..

?️अमळनेर कट्टा..मांडळ,ता अमळनेर येथून अल्पवयीन मुलीस पळवून नेल्या प्ररकणी मारवड पो ठाण्यात गुन्हा दाखल..

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी मारवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मांडळ येथील तक्रारदार परिवार शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतो.त्यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे शिक्षण ७ पर्यंत झाले असून ती सध्या शाळेत जात नव्हती. दि. २० रोजी रात्री जेवून करून सदर अल्पवयीन मुलगी व घरातील इतर सदस्य घरात झोपले होते परंतु दि. २१ रोजी सकाळी ४ वाजेच्या सुमारास घरात पाहिले असता सदर मुलगी दिसून आली नाही. तिचा परिसरात शोध घेतला मात्र तरीही ती मिळून न आल्याने. तिला अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची खात्री झाल्याने त्यांनी मारवड पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी भादवी कलम ३६३ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button