Amalner

Amalner: दुकानाची इंग्रजी पाटी बदलवून केली मराठीत..!मनसे स्टाईल चा दणका..!

Amalner: दुकानाची इंग्रजी पाटी बदलवून केली मराठीत..!मनसे स्टाईल चा दणका..!

आज अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने वर्धापन दिन निमित्त अमळनेर मध्ये मराठी फलक लावण्याबाबत निवेदन देण्यात आले होते व तसेच महाराष्ट्र सरकारने मराठी पाट्या संदर्भात कायदा पारित करून मनसेच्या 2008 या आंदोलनाची पाठराखण करत महाराष्ट्र राज्यात प्रत्येकाने मराठी पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने मनसेच्या आंदोलनाचे खरे तर फलित च आहे त्यामुळे हा मनसेचा विजय असल्याने अमळनेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तालुक्यात जल्लोष साजरा करत दुकानदार यांचे पुष्पगुच्छ व ज्यांनी इंग्रजी भाषेत फलक लावले आहेत त्यांना मनसे मार्फत तंबी ही देण्यात आली होती. तसेच त्यांना वर्धापन दिन पर्यंत मुदत देण्यात आली होती.या नुसार त्यांनी मराठीमध्ये पाटी लावली. दुकानदार पंकज सोनवणे यांचे स्वागत करताना मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप पाटील (काटे) मनसे शहराध्यक्ष धनंजय साळुंके( धनु भाऊ) मनसे सैनिक दिनेश माने (बाळू माने) महेश सोनार योगेश काटे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button