Amalner

Amalner: आवास फाउंडेशनच्या कोरोना योद्धयांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानपत्र देऊन गौरव…

Amalner: आवास फाउंडेशनच्या कोरोना योद्धयांचा प्रजासत्ताक दिनी सन्मानपत्र देऊन गौरव

अमळनेर येथील मुस्लिम बांधवांनी आवास संस्थेच्या माध्यमातून कोरोना पाझिटीव्ह मयत झालेल्या व्यक्तींना विविध धर्मांच्या रितीरिवाज प्रमाणे तालुक्यातील एकुण ११८ व्यक्तींच्या मोफत अंत्यविधी केले. अमळनेर शहरात आवास फाउंडेशन ही संस्था कार्यरत असून आता पर्यंत अनेक समाज उपयोगी उपक्रम ह्या संस्थेने राबविले आहेत.2020 हे संपूर्ण वर्ष आणि त्यानंतर आता पर्यंत कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले. सुरुवातीच्या काळात ह्या विषाणूच्या धास्तीने मृत व्यक्तींचे अंतिम संस्कार देखील नातेवाईकांना करता येत नव्हते तर कोणी घाबरून अंतिम संस्कार करण्यास पुढे येत नव्हते अश्या अत्यन्त बिकट परिस्थितीत आवास फाउंडेशन ने कोणतीही जात धर्म न पाहता फक्त माणुसकी धर्म निभावला.आणि शेकडो लोकांचे अंतिम संस्कार केले.

विशेष म्हणजे अमळनेर नगरपरिषदेने दोन वेळा ह्या संदर्भात निविदा प्रक्रिया काढली पण ही कोणीही पुढे आले नाही.मात्र आवास बहुउद्देशीय संस्थेने तत्कालीन मुख्याधिकारी यांना लेखी पत्राद्वारे मोफत अंत्यविधी करू फक्त पी पी किट नगरपरिषद पुरवावे अशी मागणी केली.आणि त्याप्रमाणे 118 लोकांचे त्या त्या धार्मिक रितीरिवाज नुसार अंतिम संस्कार केले. आणि एक उत्तम असा माणुसकी धर्म निभावला

कोरोनाकाळात अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेच्या वतीने काम केल्याबद्दल २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील पोलिस लाईन मैदानावर महसूल विभाग उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक बशीरोद्दीन शेख , गुलाम नबी पठाण, नविद शेख, सैय्यद अहेमद अली, जाविद खाँ पठाण, मजहर शेख, जमालोदीन शेख, अमजदअली शाह, इंजि इम्रान कुरैशी, असलम खान पठाण, यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध अधिकारी ,लोक प्रतिनिधी, कर्मचारी आणि नागरिक मान्यवर उपस्थित होते. ह्या सर्व टीम चे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button