Amalner

अमळनेर: “खुशी” रांगोळी पोहचली गुजराथ मध्ये..रांगोळी कार नितीन भदाणे यांची भरारी..!

अमळनेर: “खुशी” रांगोळी पोहचली गुजराथ मध्ये..रांगोळी कार नितीन भदाणे यांची भरारी..!

अमळनेर तालुक्यात उत्कृष्ट रांगोळीकार म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन भदाणे यांची रांगोळी थेट गुजराथ मध्ये पोहचली आहे.गुजरात येथील जैन धर्मीयांचे प्रसिद्ध मंदिर मणी लक्ष्मी तिर्थ येथे उपधान कार्यक्रम निमित्ताने अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांना या शुभप्रसंगी खास रांगोळ्या काढण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.ही बाब अमळनेरकरांसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.प्रसिद्ध रांगोळी कार नितीन भदाणे हे फक्त जिल्यातच नाही तर जवळपास संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.अनेक ठिकाणी आता पर्यंत त्यांनी आपल्या कलेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. नितीन भदाणे यांनी अमळनेर शहरात रामायणातील प्रसंग आपल्या रांगोळी च्या माध्यमातून चित्रित करून त्याचे प्रदर्शन अमळनेर करांसाठी भरविले होते.ही एक कलेची मेजवानीच त्यांनी अमलनेरकरांना दिली होती. आतापर्यंत आपल्या हातून शेकडो रांगोळ्या काढणारे हे हाथ आता महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून गुजरात मध्ये पोहचले आहेत.अमळनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील प्रत्येक कार्यक्रम मग तो सामाजिक, सांस्कृतिक किंवा धार्मिक असो त्यात नितीन भदाणे यांची “खुशी” रांगोळी असतेच..त्याशिवाय तो कार्यक्रमच पूर्ण होत नाही असे समीकरण आहे.एकूणच काय तर आता हा खुशी रांगोळीचे रंग लवकरच परदेशात देखील जातील.आणि तेथे देखील अमळनेर चे रंग चहूकडे पसरवून वातावरण रंगीत करतील यात शंका नाही.. नितीन भदाणे यांच्या ह्या कामगिरी चे सर्वत्र कौतुक होत आहे व सर्व स्तरातून अभिनंदन देखील होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button