अमळनेर: देवगांव देवळी हायस्कूलमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिनानिमित्ताने अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव तालुका अमळनेर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिना निमित्ताने अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले तर शाळेचे ज्येष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के यांनी प्रतिमापूजन केले.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी शाळेचे शिक्षक आय.आर. महाजन, एस.के.महाजन, एच. ओ माळी,शिक्षकेत्तर कर्मचारी एन जी देशमुख, संभाजी पाटील, देवगांव देवळीचे पालक रवींद्र पोपट पाटील उपस्थित होते.