Amalner

अमळनेर: देवगाव देवळीचा ग्रामसेवक निलंबित..

अमळनेर: देवगाव देवळीचा ग्रामसेवक निलंबित..

अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील तत्कालीन ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले ला कामांत दिरंगाई व हलगर्जीपणा केल्याने शामकांत पाटील यांच्या तक्रारीनुसार निलंबित करण्यात आले आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, कैलास रामभाऊ देसले ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत जानवे पंचायत समिती अमळनेर हे ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथे कार्यरत असतांना सन २००३,२००४,२००५,२००९,व २०१०,ते २०१४ या कालावधीत ग्रामपंचायत देवगाव-देवळी येथील मासिक सभा, ग्रामसभा, कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त नोंदवहीत लिहिणे, मासिक सभेच्या इतिवृत्त नोंदवहीत सदस्यांच्या सह्या घेवून इतिवृत्त न लिहिणे, ग्रामसभांचे कोरम पूर्ण नसतांना सभा तहकूब न करता इतिवृत्त लिहिणे असे कामकाज केले. ग्रामसभेत विविध योजनांच्या वार्षिक जमा खर्चास मंजूरी न देणे अश्या गंभीर अनियमितता केल्याचे आढळून आल्याने ग्रामपंचायत कामकाजात दिरंगाई तसेच हलगर्जीपणा केला अशी तक्रार होती. या सर्व प्रकरणावर गटविकास अधिकारी चौधरी यांनी चौकशी करून पंचायत समिती अमळनेर सेवेतून निलंबित केले असून त्यांचे निलंबन मुख्यालय बाबत तसेच दोषारोप पत्र १ ते ४ भरून सादर करण्यात आले आहे. ग्रामसेवक कैलास रामभाऊ देसले यांना देवगांव देवळी येथेच आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता हे विशेष…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button