Amalner

अमळनेर: अमळनेरच्या सुपुत्राची गगनभरारी… आरटीओ जयंत चव्हाण यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…

अमळनेर: अमळनेरच्या सुपुत्राची गगनभरारी… आरटीओ जयंत चव्हाण यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्यपालांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान…

अमळनेर तालुक्यातील कलंबू गावाचे रहिवासी आरटीओ जयंत रमेश चव्हाण यांचा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जयंत चव्हाण हे आदिवासी पारधी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश सचिव,सेवानिवृत्त शिक्षक दादासो. रमेश चव्हाण सर तसेच सेवावनिवृत्त आदर्श शिक्षिका ताईसो.सौ. ताराबाई चव्हाण यांचे लहान चिरंजीव असून जयंत रमेश चव्हाण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी-बीड (RTO) येथे कार्यरत आहेत.जयंत चव्हाण यांचे बंधू देखील अतुल चव्हाण हे आरटीओ असून त्यांचे देखील सामाजिक क्षेत्रात व प्रशासकीय क्षेत्रात उत्तम कार्य आहे. जयंताचा गौरव हा समस्त पारधी समाजासाठी खूप अभिमानाचा आहे. आदिवासी पारधी महासंघ महा.प्रदेश तर्फे त्यांचे खूप-खूप अभिनंदन केले आहे. तर आदिवासी एकता संघर्ष समिती तर्फे देखील त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button