Amalner

Amalner: त्याने केला 112 ला कॉल..पण ठरला फोल…

Amalner: त्याने केला 112 ला कॉल..पण ठरला फोल…

अमळनेर येथील एका व्यक्तीने 112 नं वर फोन करून खोटी माहिती दिल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा व्यक्तीने सहज गंमत म्हणून ११२ ह्या नं ला डांगर गावात भांडण झालं आहे असं सांगितले आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावले. प्रत्यक्ष ठिकाणी गेल्यानंतर खऱ्या प्रकारचा उलगडा झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील डांगर येथील धनराज कडू भिल याने २२ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ११२ नंबरवर कॉल करून गावात भांडण होत असल्याची तक्रार करून तात्काळ मदतीची मागणी केली. नियंत्रण कक्षाकडून ११२ च्या ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी मिलिंद भामरे व सूर्यकांत साळुंखे यांना घटनेची माहिती देण्यात आली. ताबडतोब मदतीची सूचना मिळाल्याने भामरे व साळुंखे आणि चालक घटनास्थळी डांगर येथे पोहचले. तर तेथे उभ्या असलेल्या धनराजने मी सहज मजाक मजाकमध्ये ११२ ला कॉल केला. भांडण वगैरे नाही. पोलीस खरंच मदतीला येतात की नाही हे पाहत होतो, असे सांगितले. त्यावेळी त्याच्या तोंडाचा दारूचा उग्र वास येत होता. पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने आरडाओरडा सुरू केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना हकीकत सांगितल्यानंतर त्याच्यावर भादंवि कलम १८२ आणि दारूबंदी कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत पोलिसांशी केलेली मजाक धनराजला चांगलीच भोवली आहे.

112 हा पोलीस नियंत्रण कक्षाचा टोल फ्री नंबर आहे यावर संपर्क करून आपात्कालीन,अडचणीच्या वेळी पोलिसांची मदत घेता येते. पण त्याचा दुरुपयोग केला तर काय होऊ शकते, याचा प्रत्यय देणारी एक घटना जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदाच अमळनेर तालुक्यातील डांगर गावात घडली आहे. पोलिसांना ११२ नंबर डायल करून खोट्या भांडणाची माहिती देणाऱ्या अमळनेर तालुक्यातील डांगर येथील एका इसमास चांगलेच महागात पडले असून पोलिसांचा वेळ वाया गेला तसेच दिशाभूल केली म्हणून त्याला सध्या ताब्यात घेतले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button