Amalner

Amalner: जागो न प प्यारे…स्मारकांची दुरावस्था.. न प ची अनास्था…छत्रपतीच नव्हे तर इतर स्मारके देखील स्वच्छतेच्या प्रतीक्षेत..

Amalner: जागो न प प्यारे…स्मारकांची दुरावस्था.. न प ची अनास्था…छत्रपतीच नव्हे तर इतर स्मारके देखील स्वच्छतेच्या प्रतीक्षेत..

अमळनेर शहरात अनेक श्रेष्ठ जेष्ठ क्रांतिकारक, महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.अमळनेर शहर स्मारकांचे शहर म्हणून ओळखले जाते. यात अगदी जुन्या सुभाष चौकात स्थित सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्या पासून ते राणी लक्ष्मीबाई पुतळा आणि आता नव्याने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या पर्यंत स्मारके अस्तित्वात आहेत. स्मारके बांधली तर जातात पण त्यांची स्वच्छता आणि टापटीप मात्र केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ तर प्रचंड प्रमाणात घाण असते पुतळा धुतला जात नाही.सर्वत्र गवत झाले असून महाराजांच्या पुतळ्या भोवती घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

नुकताच 23 जाने रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती होती.उद्या 26 जाने गणतंत्र दिवस… हा दिवस मिळविण्यासाठी अनेक शूर विर क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं..बलिदान दिले.. प्राणांची आहुती स्वातंत्र्याच्या अग्नी कुंडात वाहिली..तेंव्हा आज आपण गर्वाने अभिमानाने स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस मनवतो आणि अत्यन्त सुरक्षित असे आयुष्य देखील ह0जगतो पण आमच्या आजच्या प्रशासकीय व्यवस्थेला,नेत्यांना,लोक प्रतिनिधींना मात्र या सर्व गोष्टींचा विसर पडतो..महा मानवांचे पुतळे स्मारके तर मतांच्या राजकारनासाठी उभारून टाकतात पण त्यांचे जतन संवर्धन काळजी स्वच्छता राखली जात नाही. ही स्मारके महिने नो महिने वर्षानुवर्षे धूळ खात उभी असतात.आणि आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी होणारी अव्यवस्था, आबाळ, बदलता समाज पाहत राहतात.कधी तरी निश्चित त्यांना ही वाटत असेल की यासाठी आम्ही या देशाच्या स्वातंत्र्या साठी लढलो,रक्त सांडलं..? ह6या सर्व गोष्टींकडे आता तरुण वर्गाने ह्या कडे लक्ष वेधले असून सर्वच स्मारकांच्या भोवती असलेली घाण,अस्वच्छता दूर करणे आवश्यक आहे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.न प ने फक्त पुतळे न बांधता त्यांची स्वच्छता करणे आवश्यक आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे लवकरच सर्वच स्मारकांजवळील साफ सफाई केली जाईल अशी आशा बाळगू यात…

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button