Amalner

Amalner:कृ.उ. बा समितीचे भूखंड बेकायदेशीर रित्या देणाऱ्या प्रशासक व इतर सभासदांना अपात्र करा…सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची मागणी…

Amalner:कृ ऊ बा समितीचे भूखंड बेकायदेशीर रित्या देणाऱ्या प्रशासक व इतर सभासदांना अपात्र करा…सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांची मागणी…

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे हल्ली प्रशासक नेमणुक झालेली आहे. तरी निर्णय न घेता बाजार समितीतील हद्दीतील मोकळी जागा तसेच विविध योजने अंतर्गत असलेले गोडाऊन, गाळे व खुला भूखंड हे बेकायदेशीर रित्या व मुख्य प्रशासक मंडळ हे सहकार नियमांची पायमल्ली करुन धोरणात्मक निर्णयांचे
कुठलेही अधिकार नसतांना देखील चुकीचे व बेकायदेशीर ठराव करुन मर्जीतील माणसांना भाडेपट्टा (अल्पमुल्यात) देण्याचा सपाटा मुख्यप्रशासक यांनी लावलेला आहे. यात प्रचंड मोठया प्रमाणात भ्रष्ट्राचार झाल्याची शंका आहे.
उदा.
१. कुठल्याही प्रसिध्द (राज्य दर्जाचे) वृत्तपत्रात जाहिरात न देता. तसेच कुठल्याही प्रकारचा शासकीय मुल्यांकन न करता गाळे / खुला भूखंड भाडयापट्टयावर देण्यात आले आहे.
२. जाहिर लिलाव पध्दतीचा अवलंब न करणे.
३.पणण महामंडळाकडून किंवा इतरत्र शासकीय परवानग्या न घेता धोरणात्मक निर्णय राबविणे.
४ गाळे किंवा भूखंड देतांना कुठल्याही राजपत्रीत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत लिलाव झालेला नाही.
५.शासनाचे कुठलेही धोरणात्मक निर्णय घेण्याचे मर्गदर्शन नसतांना विविध धोरणात्मक निर्णय घेणे.
६. बिंदु नामावली रोस्टरनुसार कर्मचाऱ्यांची बडती (अनियमितता) झालेली नाही.
७.काही कर्मचाऱ्यांचे पी.एफ. सन २०१५ पासून ते आज तागायत जमा झालेले नाही. या बाबतही अनियमितता दिसुन येते.
८. आस्थापना खर्च गैरपध्दतीने झालेला प्रथम दर्शनी दिसतो. इत्यादी बाबी.

पणन मंडळाच्या संचालकाकडून १२ (१) ची परवानगी न घेता परस्पर भाडे पट्टयावर दुकान गाळे व अनाधिकृत बांधकाम कृ.उ.बा.समितीच्या भूखंडावर सुरु आहे.
मे. सहा.निबंधक कार्यालयातील अ शासकीय प्रशासक मंडळ नियुक्ती यात जे ९ सभासद घेण्यात आलेले आहे. त्यातील काही सभासद आज रोजी कुठल्याही विकास सोसा., ग्रा.पं.सदस्य, बाजार समितीचे परवानाधारक, व्यापारी, जिल्हा बँकेचे संचालक इ. नाहीत

1. तिलोत्तमा रविंद्र पाटील (मुख्य प्रशासक) आज रोजी जिल्हा बँक संचालिका नाही. म्हणून त्यांना त्यापदावरुन अनहर (अपात्र) करण्यात यावे.

2.भागवत केशव सूर्यवंशी, हे कुठेही सदस्य, सभासद वा संचालक नाहीत. म्हणून त्यांना त्यापदावरुन अनहर (अपात्र) करण्यात यावे.

3.लालचंद त्र्यंबक पाटील हे कुठेही सदस्य, सभासद वा संचालक नाहीत. म्हणून त्यांना त्यापदावरुन अनहर (अपात्र) करण्यात यावे.

4.किरण भालेराव पवार, हे ग्रा.पं.सदस्य होते. पण करोना काळात ते मयत झाले. त्यांचे पद रिक्त आहे.

वरील ९ सभासदांपैकी ३ सभासद, १ मयत सभासद, एकूण ४ सभासद हे अपात्रतेसाठी पात्र आहेत.
म्हणून यांना चौकशी करुन याजागी प्रशासकाची फेर नियुक्ती होणेबाबत.
मे.मागील कृ.उ.बा.समितीच्या कार्यकाळात सुधाकर सुपडू वाणी या व्यवसाईकाला ९९ वर्ष करारावर कृ.उ.बा.समिती मधील जी जागा देण्यात आली होती. त्यांनी त्या कराराचा भंग केल्या प्रकरणी माजी सभापती उदय वाघ यांनी ठराव करुन कराराचा भंग केल्या प्रकरणी सदर जागा कृ.उ.बा.समितीच्या ताब्यात घेतली होती.
पण आताच्या मुख्य प्रशासनाने सहकार नियमांची पायमल्ली करत त्याच व्यवसायीकाला (सुधाकर सुपडू वाणी) यास तिच जागा वाढीव करुन ५० वर्षाच्या करारानइ देय केली असून तेथून सदर व्यवसायीक प्रचंड टुमदार असे विना परवाना बांधकाम करीत आहे. याबाबतची चौकशी करुन सदर व्यवसायीका’ कडून ती जागा पुन्हा कृ.उ.समितीने जप्त करावी ही नम्र विनंती. मे.सदर कृ.उ.बा.समितीच्या जागा व प्रॉपर्टीवर MACP च्या योजनेचे करोडो रुपयाचा कर्जाचा बोजा चढवला असून सदरील समितीची जागा बँकेकडे तारण असतांना बँकेच्या कुठल्याही प्रकारचा ना हरकत दाखल न घेता बाजार समितीतील जागा अल्पशा भाडेपट्टयावर देण्यात आल्या. म्हणजेच शासनाची व बँकेची सरळसरळ मुख्य प्रशासनाकडून फसवणुक झाल्याची प्रथम दर्शनी दिसुन येते. कृपया याबाबतची चौकशी होणे
गरजेचे आहे.
मे. भविष्यात शेतकरी हितासाठी शासनाने जर एखादा उपक्रम राबवायचा म्हटला तर कृ.उ.बा.समिती आवारात मोकळा भूखंड नसल्या कारणाने ते राबविणे अश्यक होईल. त्यात माझ्या तालुक्यातील शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान होणार यास मुख्य प्रशासक मंडळ सारासार जबाबदार राहणार. म्हणुन प्रशासक
मंडळाने जे खुले भूखंड देण्याचा सपाटा लावला आहे. त्यांनी घेतलेले शेतकरी विघातक निर्णय हे तात्काळ रद्द करण्यात यावे ही नम्र विनंती.
मे. बाजार समितीतील कार्यालयासमोरील रस्त्याचे काम हे कु नियोजन पध्दतीने केले. तसेच बाजार समितीतील रस्ता ज्या निधीतुन खर्च केला गेलेला आहे, त्या कारणे कृ.उ.बा.समिती कर्मचाऱ्यांचे पगार, तीन महिने अनियमितता होवून कर्मचारी मानसिक व आर्थिक तनावा खाली आले असे काही कर्मचारी बांधवांकडून
कळाले. या सर्व घडलेल्या बेकायदा बाबींची गाभिय पुर्वक दखल घेत आपण तात्काळ आपल्या स्तरावरुन पारदर्शी चौकशी समिती नेमणे आगत्याचे, तसेच मुख्य प्रशासनाने जे काही धोरणात्मक निर्णय त्यांच्या कार्यकाळात (मागील १ वर्षात) घेतले ते कसुन तपासावेत व ते निर्णय बेकायदा आढळल्यास शेतकरी व कृ.उ.बा.समितीच्या हितासाठी तात्काळ रद्द करावेत. मुख्य प्रशासक यांनी घेतलेले निर्णय हे कायदयाचे पायमल्ली करणारे आहेत. अशी आम्हास शंका
आहे. तसेच ते शेतकरी विघातक आहे. म्हणून मुख्य प्रशासनाने कायदयाचा भान ठेवलेले नाही. असे प्रथम निदर्शनास येत आहे. अशा मुख्य प्रशासनाचा तात्काळ कार्यभार काढून घेण्यात यावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील इ सह जिल्हा निबंधक जळगाव ,सहा निबंधक अमळनेर,सचिव कृ उ बाजार समिती अमळनेर इ ना केली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button