Amalner

Amalner: राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीत अधिकारी म्हणून दिनेश पालवे सन्मानित…

Amalner: राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीत अधिकारी म्हणून दिनेश पालवे सन्मानित…

अमळनेर मा.भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदार दिवस दिनांक 25/01/2022 रोजी सकाळी 11.00 वाजता श्री.मिलिंदकुमार वाघ, सहा.मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अमळनेर यांचे अध्यक्षतेखाली प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आले. सदर
कार्यक्रमात विविध अधिकारी ,प्राचार्य प्रताप महाविद्यालय व विविध शाळचे प्राचार्य/मुख्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

मतदार दिनानिमीत्त उपस्थित विद्यार्थी व नवमतदारांना मार्गदर्शन करण्यांत आले. तसेच राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध,रांगोळी,वकृत्व,मीम,लघुपट,चित्रकला,घोषवाक्य,परीसंवाद व गीतगायन
इत्यादी स्पर्धांचे आयोजित करण्यात आलेल्या होत्या व सदर स्पर्धेमध्ये प्रथम व व्दितीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याना मा. उपस्थित मान्यवर यांचे हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यांत आले.
तसेच जिल्हास्तरावर सन 2021 मध्ये उत्कृष्ट कामकाज केलेले अधिकारी । कर्मचारी म्हणुन श्री.दिनेश पालवे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 159- अमळनेर, (उत्कृष्ट मतदान केंद्रस्तरीय अधिकरी), श्री. नितीन राजेंद्र ढोकणे, महसुल सहायक, तहसिल कार्यालय अमळनेर (उत्कृष्ट महसुल सहायक) व मा.श्रीमती. सीमा अहिरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर (उत्कृष्ट मतदार नोदंणी अधिकारी)
यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थी व मतदारांना मतदानांचे महत्व लक्षात आणुन देवुन तसेच 15 अमळनेर विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मा.भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्देश व कोविड अनुषंगीक सर्व नियमांचे काटेकोर पालन करुन राष्ट्रीय मतदार दिवस साजरा
करण्यांत आला.सदर कार्यक्रम प्रताप महाविद्यालय व तहसिल कार्यालय अमळनेर यांचे संयुक्त विद्यमानाने साजरा करण्यात आला.मतदार दिनामित्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रामध्ये युवा मतदार यांना जवळपास 244 Voter Card वाटप करण्यांत आले.दिनेश पालवे यांना मिळालेल्या ह्या सन्मानामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button