Amalner

Amalner: अस्वच्छतेचे आगार ग्रामीण_रुग्णालय ..!अंधेर नगरी चौपट राजा..अशी स्थिती..युवा अविनाश पाटीलने मांडली व्यथा..!

Amalner: अस्वच्छतेचे आगार ग्रामीण_रुग्णालय ..!युवा अविनाश ने मांडली व्यथा..!

अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात घाणी चे अस्वच्छतेचे साम्राज्य असून आज एका युवाने याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. अविनाश पाटील हा विद्यार्थी कामा निमित्त ग्रामीण रुग्णालयात गेला असता त्याला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या.

ह्या तरुणाने आज जे काही पाहिलं ते लोकांपर्यंत पोहचावे,प्रशासन ,लोक प्रतिनिधी यांच्या पर्यंत पोहचावे ह्या उद्देशाने ग्रामीण रुग्णालयातील काही फोटो काढले आणि सोशल मिडिया बरोबरच ठोस प्रहार कडेही पाठवले…

अविनाश ने पाठवलेले फोटो अत्यन्त बोलके आहेत…ठीक ठिकाणी पानाच्या पिचकाऱ्या,थुंकलेले..रुग्णाचे नातेवाईक च हातात सलाईन ची बॉटल घेऊन रुग्णाला पायी घेऊन जात आहेत… फाटलेल्या गाद्या… मोकळे पडलेले वैद्यकीय साहित्य जसे हँड ग्लोव्हज, रिकाम्या सलाईन,बेवारस पडलेले वैद्यकीय मशीन,उघडी, रिकामी,अत्यन्त घाण पाण्याची टाकी,अत्यन्त अस्वच्छ टॉयलेट,ऑक्सिजन सिलेंडरच्या मागे पिचकाऱ्या,तुटलेला पलंग,अस्ताव्यस्त पडलेले सलायन स्टँड व इतर सामान,असे बरेच काही जे ग्रामीण रुग्णालयाच्या बेशिस्त कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण करत आहे.

अविनाश म्हणतो की मी कॉलेजला असतांना आजारी वगैरे पडलो की ह्याच रुग्णालयात येऊन उपचार घेत असे. बऱ्याच दिवसांनी इकडे फेरी मारली म्हणून सहजच रुग्णालायात गेलो. रुग्णालयाचं बरंच चित्र बदललं होतं. कुठं बेड फाडलेल्या अवस्थेत होते तर कुठं थुंकून थुंकून भिंती रंगवलेल्या होत्या, सलाईन ची बॉटल, ऑक्सिजन सिलिंडर, निडल्स सगळे अस्ताव्यस्त कुठंही पडलेली. हॉस्पिटल मध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. पेशंट्स चे नातेवाईक हातात सलाईनची बॉटल पकडून पेशंटला नेतांना दिसत होती. हा सगळा प्रकार पाहून मी थक्क झालो. मी सरळ रुग्णालयाच्या स्टाफकडे गेलो, त्यांची उत्तरं निराशाजनक होती. सफाई कामगारापासून ते वैदयकीय अधिकारी, डॉक्टर्स, फार्मसी सगळ्यांचाच “अंधेर नगरी” सारखा कारभार सुरू होता. ताकीद देऊन फायदा नाही, तक्रार कुणाकडे करावी? म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत ही बातमी पोहचवतोय. माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की आता तरी सरकारी शाळा, सरकारी रूग्णालय, सरकारी बॅंक्स वाचवा नाही तर उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप घातक असणार यात कुठलीच शंका नाही. एकत्र या आवाज उठवा…. सरकारी मालमत्ता वाचवा.असे आवाहन अविनाश ने केले आहे.

या संदर्भात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ प्रकाश ताळे यांच्याशी भ्रमणध्वनी वरून संपर्क साधला असता…

जिल्हा आरोग्य विभागा कडुन स्वच्छते साठी ठेका दिला जातो हा ठेका संपला असून नवीन अजून देण्यात आलेला नाही तसेच दोन कर्मचारी ठेकेदारकडे सध्या उपलब्ध नाहीत एकच व्यक्ती साफ सफाई करत आहे. पण लवकरच ह्या विषयावर योग्य ती ऍक्शन घेऊ .व परिसरात रुग्णालयात स्वच्छता ठेवली जाईल. यावर स्टाफ शी बोलून योग्य ती कार्यवाही केली जाईल असे डॉ ताळे यांनी सांगितले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button