Amalner

Amalner:यात्रोत्सव च्या पार्श्वभूमीवर राजे संभाजी चौकातील मुख्य गटार दुरुस्तीची मागणी..

Amalner:यात्रोत्सव च्या पार्श्वभूमीवर राजे संभाजी चौकातील मुख्य गटार दुरुस्तीची मागणी..

अमळनेर येथील राजे संभाजी चौक(दगडी दरवाजा समोरील) मुख्य गटार दुरुस्ती तात्काळ करण्याची मा.जिल्हानियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी यात्रोत्सवच्या पार्श्वभूमीवर मागणी केली आहे.

शहराला सुमारे 250 वर्षाची परंपरा असलेल्या संत सखाराम महाराज यात्रा उत्सव पार्श्वभूमीवर रथोत्सव ,पालखीउत्सव पार पडणार आहे.प्रसंगी मोठा जनसागर परिसरात(राजे संभाजी चौकात) गोळा होतो. मागील काळात मुख्य गटारीवर दुचाकी चालकांचा अपघात देखील झाले होते. तरी सदर गटार दुरुस्ति नगरपरिषदेने तात्काळ करावी अन्यथा यात्रोत्सव दरम्यान अपघात होऊन गालबोट लागू शकतो.तसेच जर नगरपरिषदेला शक्य नसेल तर कळवावे अथवा आम्ही लोकसहभागातून करावे की काय या बाबत कळवावे असे पत्र आज दि 09 रोजी पंकज चौधरी यांनी दिल आहे.नगरपरिषद या बाबत काय दखल घेते या कडे लक्ष लागून आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button