Amalner

Amalner: सभामंडप बांधताना पाय घसरून सेवेकऱ्याचा मृत्यू..ह भ प प्रसाद महाराजांचा मदतीचा हात..

Amalner: सभामंडप बांधताना पाय घसरून सेवेकऱ्याचा मृत्यू..ह भ प प्रसाद महाराजांचा मदतीचा हात..

अमळनेर संत सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या तयारी जोरात सुरू आहे. गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा भरली नव्हती परिणामी यंदा मोठ्या उत्साहात यात्रेची तयारी सुरू आहे. मात्र यात्रेच्या सुरुवातीला च गालबोट लागले असून सभामंडप बांधताना पाय घसरून पडल्याने एका सेवेकराचा मृत्यू झाला आहे.सदर मृत्यू झालेल्या सेवेकेरीच्या कुटुंबाच्या मदतीसाठी संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज तातडीने धाऊन आले.आणि
संस्थानतर्फे कुटुंबाच्या वारसाला १० लाख रुपये, दोन्ही मुलींच्या लग्नात अन्न व वस्त्र यांच्या खर्चासह मुलाला उपजीविकेसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.प्रसाद महाराजांच्या मदतीने कुटुंब आश्वासित झाले आहे. घरातील कुटुंब प्रमुखच अचानक गेल्यामुळे वाऱ्यावर सुटलेल्या ह्या कुटुंबास गादी पुरुष प्रसाद महाराजांच्या रुपात प्रत्यक्ष विठू माऊली च मदतीला धावून आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अमळनेर करांची आण आणि शान वाढविणारा 250 वर्षांची अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा असलेला हा रथोत्सव संपूर्ण प्रति पंढरपूर अमळनेर चा रथोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे. विदेशात देखील अमळनेर च्या रथाची चर्चा असते.
ह्या रथोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक वेळात वेळ काढून आपले
योगदान देतात. असतात.नेहमी प्रमाणे राजेंद्र नारायण मिस्त्री (झालरे) हे स्व खुशीने सेवा म्हणून दि 6 मे रोजी पहाटे दीड वाजेच्या सुमारास सभा मंडप बांधण्याचे कार्य करत होते. व अचानक लाकडी सरावरून राजेंद्र मिस्तरी पाय घसरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला.यावेळी घटनास्थळी तात्काळ अनिल महाजन, मनोहर महाजन, भैय्या महाजन, रोहिदास यांगोळे, बाज पवार,व्वोधी पडाधव, पंकज भोई गोकुळ आकळकर, आबा मिस्त्री, रावसाहेब पाटील, राजू पाटील हे धावून आले त्यांनी राजेंद्र यांना रुग्णालयात दाखल केले. पण राजेंद्र यांचे प्राण वाचू शकले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी,चार मुली व मुलगा असा परिवार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button