Amalner

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने कोरोना लसीकरण.

Amalner: ऍड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने कोरोना लसीकरण.

अमळनेर अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने कोरोना लसीकरण करण्यात आले.
अँड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल येथे शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम घेऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव प्रा शाम पाटील, प्राचार्य विकास चौधरी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी संपूर्ण देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ९वी व १०वी तील ६३ विद्यार्थ्यांना कोरोना लस देण्याचा दुसरा टप्पा पार पडला. लसीकरण मोहिमे साठी अमळनेर वैद्यकीय अधिकारी डॉ विलास महाजन ,प्रसाद क्षीरसागर, वंदना पाटील व शितल बोरसे यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button