Amalner

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज फक्त ग्रामीण भागात   5 रुग्ण कोरोना बाधित..!

Amalner:कोरोना Update.. तालुक्यात आज फक्त ग्रामीण भागात 5 रुग्ण कोरोना बाधित..!

अमळनेर तालुक्यात आज 5 रुग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.यात आज जानवे या एकाच गावात 5 रुग्ण कोरोना बाधित आढळले तर शहरी भागात एकही रुग्ण आढळून आला नाही.दरम्यान काल 10 रुग्ण आरटीपीसीर चाचणीत कोरोना बाधित आढळून आले होते. अशी माहिती डॉ गोसावी यांनी दिली आहे.

दरम्यान नगर परिषदेच्या अतिक्रमण पथकाचे प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांच्या पथकाने विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर आज पुन्हा दंडात्मक कारवाई करत आहेत. पण इतर ठिकाणी मात्र कोरोना नियमांचे उल्लंघन केले जात असून प्रशासन सोईस्कर पणे त्याकडे दुर्लक्ष करत आहे. अमळनेर तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटे पासूनच भेदभाव केला जात असून मोठी धेंडे कशी सुरक्षित राहतील याची काळजी प्रशासन “अर्थ”पूर्ण रित्या घेत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button