Amalner

Amalner:कोरोना Update… आज 22 रुग्ण कोरोना बाधित..चढता आलेख..

Amalner:कोरोना Update… आज 22 रुग्ण कोरोना बाधित..चढता आलेख..

अमळनेर तालुक्यात दि 19 जानेवारी रोजी 22 रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण संख्येचा आलेख रोज वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसरत होत आहे.देशमुख नगर,पटवारी कॉलनी,मिलचाळ ,तांबेपुरा, ढेकूरोड,प्रताप मिल कंपाउंड, बंगाली फाईल इ भागात 1
मुंदडा नगर, केशवनगर , पैलाड येथे 2 तर आर के नगरने चौकार मारला आहे. असे एकूण 22 रुग्ण कोरोना बाधित आले आहेत.

सध्या वातावरणात रोज बदल होत आहेत हिवाळ्यात देखील पाऊस पडत असून नागरिकांना ह्या बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे.त्याचप्रमाणे नागरिक अत्यन्त निष्काळजी पणे बेजबाबदार पणे नियमांचे उल्लंघन करत आहेत परिणामी कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे पण पाहिजे त्या प्रमाणात नियम पाळले जात नाहीत.नागरिक बेजबाबदार पणे वागत आहे.तर प्रशासन मागील प्रमाणे व सवयीनुसार काही ठिकाणी कार्यवाही तर काही ठिकाणी कार्यवाही न करता भेदभाव करत आहे. अशी काही ठिकाणे ,दुकाने ,व्यापारी आहेत की ज्यांना प्रशासनाने नेहमीच पाठीशी घातले आहे. ठोस प्रहारने सातत्याने “प्रशासनाचे जावई” ह्या मथळ्याखाली बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button