Akaluj

एस.एम.आवताडे कंपनीला पुन्हा 14 कोटी 89 लाखांचा दंड..! 46 कोटींचा झाला दंड तरीही तहसीलदार थंड का ? महसूली अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद..

एस.एम.आवताडे कंपनीला पुन्हा 14 कोटी 89 लाखांचा दंड..!
46 कोटींचा झाला दंड तरीही तहसीलदार थंड का ? महसूली अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद..

अकलूज : मौजे खळवे,ता.माळशिरस येथील बहुचर्चित मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सोलापूर-106,माळखांबी ते पंढरपूर पालखीमार्ग अवैध गौणखनिज मुरूम उत्खनन प्रकरणी श्री.एस.एम.आवताडे प्रा.लि.कंन्स्ट्रक्शन कंपनीला पुन्हा 14 कोटी,79 लाख,51हजार500 रू.दंडाचे आदेश माळशिरस तहसीलदार जगदिश निंबाळकर यांनी पारीत केले आहेत.सदर अवैद्य गौणखनिज मुरूम उत्खनन प्रकरणी आवताडे यांना एकुण 44,630 ब्रास अनधिकृत मुरूम उत्खनन प्रकरणी एकुण 46कोटी,41लाख,90 हजार 700 रू. एवढा आर्थिक दंड तहसीलदार निंबाळकरांनी ठोठावला आहे.
यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख-स्वप्निलभैय्या वाघमारे व युवासेना पदाधिकारी यांनी अंदोलन व अनेक वेळा निवेदने देऊन सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा प्रांताधिकारी पवार व तहसीलदार निंबाळकर आवताडे कंस्ट्रक्शन कंपनीला फक्त दंडाचे आदेश पारीत केले खरे पण आदेश करून बघ्याची भूमिका घेत शांत बसले आहेत. जमिन महसुल अधिनियमानुसार संबंधितांना आदेश केल्याप्रमाणे सदर दंडाची रक्कम 7 दिवसांत न भरल्यास धारण केलेल्या जमिन मिळकतीवर दंडात्मक रकमेचा बोजा ठेवुन वसुल करण्याची अंमलबजावणी करण्यास तहसिलदार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. तहसिलदारांच्या या भूमिकेमुळे शासनाचा मोठा महसुल बुडविला जाणार आहे.या पाठीमागे तहसिलदार निंबाळकर व आवताडे यांचे आर्थिक लागेबंध असु शकतात अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे.तहसीलदार हे वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करीत नाहीत तसेच गौणखनिज प्रकरणी कारवाईची अंमलबजावणी करीत नाहीत,त्यामुळे तहसीलदार निंबाळकर व तलाठी साठे यांचेवरती निलंबनाची कारवाई करण्याची मागणी युवासेना जिल्हाप्रमुख स्वप्निल वाघमारे यांनी केली आहे. “मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सोलापूर-106 पालखीमार्ग प्रकरणी दंडात्मक कारवाईचे प्रथम आदेश पारीत होवुन दोन महिने व द्वितीय आदेश पारीत होवुन 15 दिवस झाले तसेच प्रांताधिकारी पवार व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंमलबजावणी विचारणा होत असुनही तहसीलदार निंबाळकर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ का करीत आहेत?असे निष्क्रिय तहसीलदार निंबाळकरांच्या निलंबनाची मागणी युवासेनेतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडे मागणी केली आहे.” -स्वप्निल दत्तात्रय वाघमारे,युवासेना जिल्हाप्रमुख

Leave a Reply

Back to top button