Amalner

Amalner: कोरोना Update..तालुक्यात आज कोरोनाचा चौकार..!एकूण रुग्ण 14..!

Amalner: कोरोना Update..तालुक्यात आज कोरोनाचा चौकार..!एकूण रुग्ण 14..!

अमळनेर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आज 2 ग्रामीण आणि 2 शहर असे 4 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण रुग्ण संख्या 14 एव्हढी आहे.आरोग्य प्रशासन सतर्क असून सर्व खबरदारी घेण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर पोलीस व नगरपरिषद पथक सक्रिय झाले असून सतत 2 ते 3 दिवसांपासून विना मास्क ची कार्यवाही सुरू आहे. 39 जणांना मास्क नसल्याबाबत प्रत्येकी 200 रु प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.

पोलीस व नगरपरिषद हे संयुक्त रित्या कार्यवाही करत असून यात सहाययक पोलिस निरीक्षक गंभीर शिंदे , हे कॉ संजय पाटील, भरत ईशी इ तर न प कडून अतिक्रमण विभागाचे राध्येश्याम अग्रवाल, कुणाल फथ्रोड , कुंदन सोनवणे,बापू सोनटक्के इ नी 39 जणांवर कारवाई करत प्रत्येकी 200 रुपये दंड करण्यात आला आहे.यामुळे निश्चितच पुन्हा नागरिक नियमांचे पालन करतील अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button