Amalner

Amalner: कोरोना Update..एकूण 17 रुग्ण पॉझिटीव्ह..पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लहान मुलांचा समावेश..!तर न प चे दोन कर्मचारी कोरोना बाधित..!

Amalner: कोरोना Update..एकूण 17 रुग्ण पॉझिटीव्ह..पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये लहान मुलांचा समावेश..!तर न प चे दोन कर्मचारी कोरोना बाधित..!

अमळनेर:- तालुक्यात काल 17 कोरोना बाधीत आढळले असून ग्रामीण भागात दोन व शहटात 15 रुग्ण आढळून आले तर काल तालुक्यात 10 रुग्ण कोरोना बाधित
आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मुलांचे प्रमाण 40 ते 50 टक्के असून आता पालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

नागरिकांच्या बेशिस्त पणा मुळे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याबाबत प्रशासन कार्यरत असून शहरातील व तालुक्यात विना मास्क फिरणायांवर पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व पोलीस कर्मचायांनी प्रत्येकी 200 रुप्याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

ढेकु रोड, पटवारी कॉलनी, रामवाडी, विद्या विहार कॉलनी, कुंटे रोड, पाठक गल्ली, एमएससीबी कॉलनी इ ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर ग्रामीण भागात करणखेडा आणि निंभोरा या गावात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.याबरोबर नगर परिषदेतील दोन कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button