Amalner

Amalner: कोरोना Update..तालुक्यात एकूण 11 रुग्ण बाधित..!

Amalner: कोरोना Update..तालुक्यात एकूण 11 रुग्ण बाधित..!

अमळनेर तालुक्यात 20 जानेवारी रोजी 11 रूग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण संख्येचा आलेख रोज वाढत आहे.त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चांगलीच कसरत होत आहे.कृषी नगर,प्रताप मिल कंपाउंड,त्रिकोणी बगीचा,केशव नगर,मुक्ताई वाडी,ढेकू रोड, भागवत रोड, प्रत्येकी 1 तर गोदावरी नगर ढेकू रोड, पैलाद प्रत्येकी 2 तर ग्रामीण भागात धार येथे 1 असे एकूण 11 रुग्ण कोरोना बाधित आले आहेत.

सध्या वातावरणात रोज बदल होत आहेत हिवाळ्यात देखील पाऊस पडत असून नागरिकांना ह्या बदलत्या वातावरणाचा त्रास होत आहे.त्याचप्रमाणे नागरिक अत्यन्त निष्काळजी पणे बेजबाबदार पणे नियमांचे उल्लंघन करत आहेत परिणामी कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे.प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे पण पाहिजे त्या प्रमाणात नियम पाळले जात नाहीत.नागरिक बेजबाबदार पणे वागत आहे.तर प्रशासन मागील प्रमाणे व सवयीनुसार काही ठिकाणी कार्यवाही तर काही ठिकाणी कार्यवाही न करता भेदभाव करत आहे. अशी काही ठिकाणे ,दुकाने ,व्यापारी आहेत की ज्यांना प्रशासनाने नेहमीच पाठीशी घातले आहे. ठोस प्रहारने सातत्याने “प्रशासनाचे जावई” ह्या मथळ्याखाली बातम्या प्रकाशित केल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button