Chimur

विद्यार्थ्याचे कोतूक करायला आलो ना विजय वडेट्टीवार

विद्यार्थ्याचे कोतूक करायला आलो ना विजय वडेट्टीवार

शंकरपूर चिमूर प्रतिनिधी–ज्ञानेश्वर जुमनाके

विद्यार्थ्याच्या कला गुणांना वाव मिडावा यासाठी क्रीडामहोत्सवाचे आयोजन केले जाते या महोत्सवातुन विद्यार्थ्याची प्रगती होत असते म्हणून या विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी येथे आलो आहे शिक्षकांनीही आपली सर्वच ध्यान देऊन विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी प्रयन्त करावे असे प्रतिपादन मदत पूनर्वसन ओ बी सी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

विद्यार्थ्याचे कोतूक करायला आलो ना विजय वडेट्टीवारते शंकरपुर येथे पंचायत समिती चिमूर व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलनात उदघाटन स्थानावरून बोलत होते या संमेलनाचे अध्यक्ष स्थानी पंचायत समिती सभापती लता पिसे प्रमुख पाहुणे म्हणून खनिकर्म विकास महामंडळ व माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर जी प सदस्य तथा गट नेते डॉ.सतिशभाऊ वारजूकर उपसभापती रोषण ढोक जी प सदस्य गजानन बुटके जी प सदस्य ममता डुकरे प स सदस्य शांताराम सेलवतकर भावना बावनकर नर्मदा रामटेके पुंडलिक मत्ते गीता कारमेघे सरपंच.दिक्षाताई भगत उपसरपंच सविता चौधरी नागभीड चे सभापती प्रणययाताई गड्डमवार गट विकास अधिकारी संजय पुरी गट शिक्षणअधिकारी किशोर पिसे कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती नंदू गावंडे सदस्य आमोद गौरकर ग्रा प सदस्य,सुषमाताई राहुड,वैशालीताई सहारे,इंदिराताई नंनावरे,कमलताई राऊत,पिंटूभाऊ शेरखी,सचिनभाऊ रासेकर,संजयजी नंनावरे,अशोक चौधरी, आदर्श शिक्षक रामभाऊ भांडारकर,वासुदेवजी सहारे,मंचावर उपस्थित होते

विद्यार्थ्याचे कोतूक करायला आलो ना विजय वडेट्टीवारदीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते सातही बिटाचे ध्वजारोहण करण्यात आले याच संमेलनात विविध शाळेच्या वतीने झाकी सादर करण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक काकाजी वाघमारे विनोद गेडाम प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे आभार केंद्रप्रमुख रुपचंद बन्सोड यांनी केले
(या कार्यक्रमाच्या निमित्ताने शंकरपूर ग्राम पंचायतने डॉ.सतिशभाऊ वारजूकर यांच्या संकल्पनेतून शंकरपूर गावातील विधवा महिलांना सरपंच आधार योजनेचा सुभारंभ मा. ना.विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले या योजनेत गावातील विधवा महिलांना आधार म्हणून दर वर्षी १००० हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य सामान्य फ़ंडातून देण्यात येणार आहे,)

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button