Amalner

Amalner: स्वामी समर्थ मंदिराजवळ अत्याधुनिक ब्रेकर बसविण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी..

Amalner: स्वामी समर्थ मंदिराजवळ अत्याधुनिक ब्रेकर बसविण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी..

अमळनेर स्वामी समर्थ मंदिराजवळील चौकात अत्याधुनिक ब्रेकर बसवा.ब्रेकर नसल्यामुळे अपघात होत असून रस्ता तयार करतांना याबाबत दुर्लक्ष झाले आहे.याबाबत परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला याबाबत निवेदन दिले
आहे.तसेच योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.

स्वामी समर्थ मंदिर प्रवेशद्वार जवळील चौकात डी आर कन्या शाळा , जी एस हायस्कुल, इंदिरा गांधी शाळा, मुंदडा माध्यमिक विद्यालय या शाळेतील मुले रस्ता क्रॉस करतात. याचा विचार न करता ब्रेकर बसवले गेले नाहीत. काम सुरू असतांना शाळा कोरोनामुळे बंद होत्या. आता याठिकाणी चौफुली असतांना
गोंधळ उडतो व अपघात प्रमाण वाढले आहे. या भागात वाहतूक कोंडीचा उपद्रव वाढतच आहे. ज्यावेळी शाळा भरते आणि सुटते त्यावेळी पायी, सायकली घेऊन विद्यार्थी मोटारसायकल चालक त्यात हि तीन चाकी वाहने यामुळे वाहतुकीचे तीन तेरा होतात. मोठा गोंधळ उडतो व यावेळी वाहतूक ठप्प होते. तब्बल 15 मिनिटे
कोंडी सुरू असते याकडे कोणीही प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. ही शहराच्या दुर्दैवाची बाब आहे यासाठी शाळेच्या मुलांचा विचार केला तर ही समस्या सुटेल इतके निश्चित. रस्ता तयार करण्याआधी याठिकाणी ब्रेकर होते. त्यामुळे वाहने वेग कमी करत आता ट्रक मोटारसायकल आणि इतर वाहने या चौकात भरधाव येतात. आणि वाहतूक कोंडी प्रचंड होते यासाठी ब्रेकर बसवावे अशी मागणी करत या भागातील व्यावसायिक आर पी भावसार, रोशन दाभाडे, पंकज चौधरी, उमाराज रसवंती, महेंद्र
पाटील, दीपक पाटील, पतंजली आरोग्य केंद्र, माँ गायत्री ऑनलाईन सर्व्हिसेस, वर्षा मेडिकल, पद्मालय फोटो स्टुडिओ, चेतन जैन, दिलीप जैन, प्रकाश जाट, खंडू जैन, प्रितेश जैन, योगेश्वर डेअरी,रयत ऑनलाइन सर्व्हिसेस, दिव्या मोबाईल शॉप, शिवम बुक, शशिकांत पाटील, पंकज टायपिंग आदींनी निवेदन दिले आहे.तसेच याबाबत संबंधित अधिकायांनी लक्ष न दिल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा देखील दिला आहे. संबंधित पत्राच्या प्रति प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम अभियंता, पालिका मुख्याधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button