Pandharpur

19 फेब्रुवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा डोक्याच्या केसांमध्ये युवक वर्गाने साकारली

19 फेब्रुवारी निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा डोक्याच्या केसांमध्ये युवक वर्गाने साकारली

रफिक अत्तार पंढरपूर

पंढरपूर : पंढरपूर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज यांची यंदा ३९१ वि जयंती साजरी करण्यात येणार आहे. परंतु या जयंतीवर कोरोनाचे मोठे सावट आहे.सरकारनेही जयंती साजरी करण्यासाठी काही नियम लागू केले आहे.तरीही तरुणाईत सर्वत्र मोठा उत्साह असल्याचे दिसत आहे.आपल्या लाडक्या राजाच्या जयंती साठी आप-आपल्या परीने जो तो परिश्रम घेत आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा अगदी हुबेहूब डोक्यातील केसांमध्ये ओके हेअर ड्रेसेस चे मालक तुकाराम चव्हाण यांनी साकारली आहे .दरवर्षी महापुरूषांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी महापुरूषांची प्रतिमा आपण युवकांच्या केसांमध्ये साकारत असल्याचे प्रतिपादन तुकाराम चव्हाण यांनी केले.तुकाराम चव्हाण हे पंढरपुरातील सलून व्यवसाय करणारे कलाकार असून त्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल, श्री गणेश, क्रांतीसुर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर वर्ल्ड कप यांच्यासह अनेक महत्वाच्या कलाकृती त्यांनी आजपर्यंत साकारलेल्या आहेत. तुकाराम चव्हाण हे सलून दुकान मालक संघटनेचे व्हा.चेअरमन म्हणून कार्यरत असून आजपर्यंत त्यांनी समाजसेवेमध्ये ही आपला वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यांच्या या कलाकृतीचे पंढरपूर तालुक्या सह पंढरपूर शहर, सोलापूर जिल्ह्यातील शिवप्रेमी नागरिकांमधून मोठे कौतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button