Amalner

Amalner: छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शिव जयंती निमित्ताने भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात संपन्न

अमळनेर छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे शिव जयंती निमित्ताने भव्य दिव्य शिवजन्मोत्सव सोहळा जल्लोषात संपन्न

अमळनेर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती व विविध तरुण संघटनांनीं यावेळी शिव जयंती निमित्त अमळनेर च्या विविध क्षेत्रातील प्रातिनिधिक महिलांच्या हातून शिवजन्माचा पाळणा हलविण्यात आला. बालशिवाजीला पाळण्यात बसवून आजच्या उत्सवाचे आकर्षण ठरलेल्या मराठी बिग बॉस तारका मिनल शहा, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार, डॉ.श्रध्दा वानखेडे, ऍड.मिनाक्षी साळुंखे,शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा शिंदे,महिला कार्यकर्त्या शितल सावंत, दामिनी पथकातील महिला पोलिस रेखा ईशी, ज्योती शिंगाने,प्रिन्सिपल डॉ.मंजुळा नायर आदिंसह शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी शिवजन्म ते शिवराज्याभिषेक पर्यंतचा शिवचरित्र असलेला पाळणा यावेळी गाऊन शिवजन्म सोहळा शेकडो महिला,युवतीच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी प्रतिकात्मक हत्तीवर बसलेल्या मावळ्यांच्या वेशातील बालकांनी खडी साखर वाटप करून आनंद व्यक्त करीत शिवजन्माचा ऐतिहासिक क्षण साजरा केला.

तर यावेळी बिगबॉस तारका मीनल शहा हि राजमाता जिजाऊच्या वेशात व शिवतेज शिंदे हा बाल छत्रपती शिवराय यांच्या वेशात रथावर आरूढ झाले.सोबत सईबाई , ताराराणी, येसूबाई, हिरकणी यांच्या वेशभूषा केलेल्या बालिकांचा समावेश असलेला रथ मावळ्यांनी ओढून मिरवणूक काढली,शिवभक्तांनी जय जिजाऊ जय शिवराय!छ.शिवरायांच्या जयघोषानी संपुर्ण परिसर दणाणून सोडला होता. ढोल-ताशाच्या गजरात बजरंगबली टिपरी डान्स पथकाने चित्तथरारक प्रात्यक्षिके यावेळी सादर करून लक्ष वेधून घेतले.सायरदेवी बोहरा स्कुल च्या विद्यार्थ्यांनीही नृत्य नाटिका ,प्रतापगडाच्या पराक्रम सादर केला.मोरया नाट्य संस्थेच्या वतीने मिरवनूकीतील जिजाऊ शिवरायांच्या रथाचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी सौ सिमा अहिरे,मा.आ.शिरिषदादा चौधरी,न प प्रशासन अधिकारी प्रशांत सरोदे, संजय चौधरी,डॉ अनिल शिंदे,पारोळाचे मा.नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा,सौ.सुलोचना वाघ यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले.याप्रसंगी विविध वेशभूषेत असलेल्या बालकांनाआदींच्या प्रमाणपत्र व श्री.मंगल फोटो देऊन गौरविण्यात आले.शिवजयंती सोहळ्याचे सूत्रसंचालन रणजित शिंदे यांनी केले.

अमळनेर च्या मानाच्या शिवजयंती उत्सवाचे यशस्वी आयोजनासाठी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे सर्व युवा सामाजिक कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीसह ,अमळनेर युवा मित्र परिवार,मंगळग्रह मंदिर संस्थानचे डिगंबर महाले यांचे तर्फे प्रतिमा व प्रमाणपत्र देण्यात आलीत. राहुल कंजर व तुषार सोनार यानी शिवभक्तांसाठी पेयजल वाटप तर दादा मोरे यांचे तर्फे पोहे वाटप , सिद्धू चौधरी व पवन चौधरी यांच्या कडून लस्सी पाऊच यावेळी वाटप करण्यात आले तर रानाजी बँड यांचा सुप्रसिद्ध बँड मिरवणुकीत होता.खान्देश रक्षक संघटनेच्या सेवानिवृत्त सैनिकांनी सुरक्षा व्यवस्था यावेळी सांभाळली.

अमळनेर शहरातील शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान वंदना देण्यासाठी शिवरायाच्या मावळयांची अफाट गर्दी यावेळी लोटली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button