Amalner:सावधान….बोरी नदीत दूषित रसायनांमुळे लाखो मृत मासे…!नागरिकांसह प्राण्यांना धोका..!
अमळनेर येथील नंदगाव शिवारात बोरी नदीच्या पात्रात विप्रो तसेच शहरी भागातील दूषित केमिकलयुक्त पाण्यामुळे लाखोच्या संख्येने मृत मासे पाण्यावर तरंगताना आढळून आले आहे. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे,या दूषित तसेच केमिकल युक्त पाण्यामुळे गुरेढोरे यांच्यावर ही विपरीत परिणाम होऊ शकतो. पाण्याच्या दुर्गंधी युक्त वास येत असून,त्या ठिकाणी प्रशासनाने धाव घेतली आहे, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे, तसेच दोषींवर सखोल चौकशी करून कडक कायदेशीर कार्यवाही व्हावी असे ग्रामस्थांनी मागणी केली आहे.