Kolhapur

दैदिप्यमान परंपरा असलेली विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक शाळा

दैदिप्यमान परंपरा असलेली विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक शाळा

सुभाष भोसले-कोल्हापूर
” मज मनापासून आवडते ही शाळा ‘लाविते लळा जसा माऊली बाळा ” या कवितेच्या ओळी प्रत्येकाला भूतकाळात घेऊन जातात.मोठमोठ्या महाविद्यालयात शिकतांना आणि शिकून बाहेर पडल्यावर देखील प्राथमिक शाळेची आंतरिक ओढ कमी होत नाही.उलट दिवसागणिक ती वाढत जाते.शाळेची आणि अक्षरांची पहिली ओळख होते ती प्राथमिक शाळेत !,माणसाला जीवनात उतुंग स्थानावर पोहचण्यासाठी पाया भक्कम असावा लागतो आणि हा पाया मजबूत करून पायावर उभं करणाऱ्या प्राथमिक स्तरावरील शाळा आहेत.
भुदरगड तालुक्याचा उपतालुका म्हणून प्रसिद्ध असलेले मडीलगे बुद्रुक हे गाव शैक्षणिक दृष्टीने पुढारलेले गाव मानले जाते. या गावात हजारो पदवीधर, शेकडो,इंजिनिअर, शिक्षक,प्राध्यापक, शासकीय अधिकारी,उद्योगपती, कवी,साहित्यिक ,डॉक्टर,संशोधक,राजकीय नेते झाले आहेत.या शाळेचे अनेक विद्यार्थी परदेशात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करीत आहेत.याचे मूळ कारण म्हणजे येथील विद्यामंदिर मडीलगे बुद्रुक ही शाळा.या शाळेने असंख्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निर्माण केलेले आहेत. अशा दैदिप्यमान इतिहासाची जननी असलेल्या मडीलगे शाळेची ख्याती संपूर्ण राज्यात पसरलेली आहे.पूर्व प्राथमिक ते प्राथमिक असा उलटा प्रवास होऊन सुद्धा इथल्या शाळेचा दर्जा मात्र चढत्या कमानीने अत्युच्च झाला आहे.
मडीलगे बुद्रुक हे गाव बाजारपेठ असल्याने प्रसिद्ध आहे.या गावात अठरा पगड जातीचे लोक पारंपरिक व्यवसाय आजही करीत आहेत.या गावात इंग्रज काळात १नोव्हेंबर १८७३ साली पहिली ते सातवी अशी पूर्वप्राथमिक उपतालुका शाळा सुरू केली.यामध्ये कुमार विद्यामंदिर ही मुलांची आणि कन्या विद्यामंदिर ही मुलींची अशी वेगवेगळी शाळा भरू लागली . गावाच्या पूर्वेला माळावर एका खोलीत ही शाळा सुरू झाली.शाळेचा विस्तार वाढत गेल्यावर शाळेच्या तीन खोल्या,गावातील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात एक वर्ग,खाजगी जागेत शाळा भरू लागली.त्या काळात काही सुखवस्तू कुटुंबातील मुले शाळेत जाऊ लागलीत.या शाळेत मडीलगे बुद्रुक, मडीलगे खुर्द,वाघापूर, कलनाकवाडी ,निळपन, नाधवडे, कोनवडे, कुर,गंगापूर, मुदाळ,पळशिवणे या गावातील मुलं मुली शाळेत प्रवेश घेऊ लागलीत.हळूहळू शाळा बाळसं धरू लागली होती.मुले पहिल्यांदाच धुळाक्षरे गिरवू लागली होतीत.काही मुलीही शिकू लागल्या. १९३१ साली चौतीस मुली या शाळेत शिक्षण घेत होत्या. स्वातंत्र्य पूर्व काळातील मुलींची ही संख्या लक्षणीय आहे.देश स्वतंत्र होण्यापूर्वी २६२ मुलींनी या शाळेत शिक्षण घेतलेले आहे.पूर्वप्राथमिक शिक्षण आठठ्यांन्नव (९८) वर्षांनी म्हणजेच १९७१ साली पाचवी ते सातवीचा स्तर रद्ध झाला.
१९३१ ते आजअखेर या शाळेतून ७९९९ विद्यार्थी आणि ३८१३ विध्यार्थीनींनी शिक्षण घेतलेले आहे.१९३१ पूर्वीचे दस्तऐवज नष्ट झालेले आहेत. पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत १२७ विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.२००४साली मोहन पाटील यांनी मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळला.त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेचा दबदबा निर्माण झाला आणि आजही तो कायम ठेवण्यात दत्ताजीराव नलवडे यांना यश मिळाले आहे.१९५१ पासून आज अखेर सोळा मुख्याध्यापक झालेले आहेत.सद्याचे सतरावे मुख्याध्यापक दत्ताजीराव नलवडे हे देखील या शाळेचे विद्यार्थी आहेत.
तालुक्यातील पहिली उपतालुका शाळा,तत्कालीन काळात मुलींची संख्या लक्षणीय, माझा वर्ग माझी ओळख या अंतर्गत आंतरबाह्य सजलेली देखणी इमारत,चहुबाजूंनी बंदिस्त ,गावाच्या मध्यवस्तीत आलेली ही शाळा मनोहारी झालेली आहे.या शाळेत विद्यार्थ्यांचा वाढदिवस साजरा करतांना विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुस्तके भेट म्हणून देण्याची प्रथा सुरू आहे.या शाळेत २६००पुस्तकांचे समृद्ध ग्रंथालय आहे.ई लर्निंग,संगणकावर शिक्षण,व्यसनमुक्ती, संस्था भेटी,सहली,वनभोजन ,स्वछता अभियान, पाककृती अंतर्गत विविध खाद्य पदार्थ बनवण्यासाठी शिकवले जातात.असे उपक्रम राबविले जातात.या शाळेचा विद्यार्थी सद्या सतरावे मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. या शाळेला ग्राप सदस्य,पालक संघ,अनेक ज्ञात अज्ञात व्यक्तींची मदत आहे.

या शाळेचे शिवाजीराव देसाई हे देश स्वतंत्र होण्यापूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले आहेत. पी टी चौगले हे यशस्वी उद्योजक आहेत.दिनकरराव नलवडे हे जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष तर नंदकुमार ढेंगे हे सभापती, पांडुरंग काकडे,दत्ताजीराव उगले,सुनील कांबळे, हे कारखान्याचे संचालक झाले आहेत.संग्रामसिंह देसाई पंचायत समिती सदस्य आहेत तर युवराज सुर्वे,बाबूराव कांबळे ग्रामपंचायत सदस्य आहेत. महेंन्द्र देसाई उपसरपंच आहेत उमेश कांबळे हे कृषी विद्यापीठात संशोधक म्हणून काम करीत आहेत.डॉ जयंत कळके,डॉ.प्रकाश साळवी,डॉ विनायक पारळे हे साहित्यिक तर डॉ विनायक काकडे,डॉ सुमेध कांबळे, डॉ भगवान उगले,डॉ प्रसाद ढेंगे,डॉ महेश शेळके यांच्या सारखे अनेक वैद्यकीय अधिकारी, सुनील पाटील, निवृत्ती बामणे हे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत.याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले एमटेक होणारे धनाजीराव कांबळे हे या शाळेचे विद्यार्थी आहेत.त्यांनी आणि संदीप देसाई यांनी भुदरगड तालुक्यात पहिल्यांदा शिष्यवृत्ती उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.शेकडो इंजिनियर,शेकडो प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक झाले आहेत
अशी ही विद्यामंदिर मडिलगे बुद्रुक शाळा खरोखरंच अभिनंदनास पात्र आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button