Amalner

अमळनेर: 5 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला बोरी नदी पात्रात..!

अमळनेर: 5 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला बोरी नदी पात्रात..!

अमळनेर येथील रहिवासी 5 वर्षीय मुलगी कु.जोया शेख तैयाब रा कुरेशी मोहल्ला अमळनेर येथुन दि 23 नोव्हेंबर पासून हरवली होती. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. आज दुपारी सदर मुलीचा मृतदेह बोरी नदी पात्रात आढळून आला आहे.फरशी रोड जवळ मासे पकडणाऱ्या मुलांना सदर मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला.ह्या ठिकाणी मुलीच्या पालकांना बोलवले असता त्यांनी कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवली आणि ते ओक्साबोक्शी रडू लागले.मुलीचे वडील तय्यब कुरेशी हे गेल्या 3 दिवसांपासून मुलीचा शोध घेत होते.

मृतदेह अत्यन्त वाईट अवस्थेत असून काल रात्री नदी पात्रात टाकण्यात आला असावा.सदर मृतदेह हा ग्रामीण रुग्णालयात नेऊन कॅमेरा मध्ये शवविच्छेदन करण्यात आले आहे. तर व्हिसेरा आणि इतर तापसण्यांचे अहवाल अजून बाकी आहेत.यानंतर बऱ्याच गोष्टी समजणार असून या प्रकाराबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button