Yawal

चुंचाळे विकासो निवडणूकीत तेरा जागांसाठी ३४अर्ज दाखल…छाननीत सर्वच अर्ज वैध ..आता माघारीकडे लक्ष

चुंचाळे विकासो निवडणूकीत तेरा जागांसाठी ३४अर्ज दाखल
●छाननीत सर्वच अर्ज वैध
●आता माघारीकडे लक्ष
यावल तालुका प्रतिनिधी अमित तडवी
चुंचाळे तालुका यावल येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी या संस्थेची सन २०२१/२२ ते २०२६/२७ या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीपर्यंत १३ जागांसाठी तब्बल ३४ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहे तर अर्ज छाननीत सर्वच्या सर्व अर्ज वैध ठरले आहे.दि.९ रोजी अर्ज छाननी होती. आता सर्वांचे लक्ष माघारीकडे लागले असून माघारी नंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
हि निवडणूक १३ जागांसाठी होणार असून कर्जदार खातेदार प्रतिनिधी मतदारसंघात आठ जागांसाठी तब्बल १० उमेदारी अर्ज दाखल झालेले आहे. यात उज्जैनसिंग राजपुत,सज्जीवसिंग राजपुत, समाधान धनगर, युवराज पंढरीनाथ तेली,रमेश यशवंत पाटील, समाधान पाटील, सुधाकर पाटील, पंडीत कोळी,धुडकू शिवदास कोळी, योगेश पंडीत पाटील यानुसार अर्ज दाखल आहे. त्याचप्रमाणे महिला राखीव मतदारसंघात दोन जागांसाठी अनिता गणेश पाटील, चंद्रलेखा रविंद्र पाटील, अंजनाबाई युवराज पाटील,साधना सुकलाल पाटील, ज्योती सुनील नेवे असे पाच अर्ज तर इमाव (ओबीसी) राखीव मतदार संघात एका जागेसाठी खिलचंद सारंगधर चौधरी, प्रेमराज सिताराम चौधरी,असे दोन अर्ज दाखल आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती- जमाती राखीव मतदारसंघात एका जागेसाठी मेहेरबान मनवर तडवी,कबीर हुसेन तडवी, इस्माईल सिकंदर तडवी असे तीन अर्ज तर विजा/भज व विमाप्र राखीव एका जागेसाठी रामकृष्ण राजाराम सोनवणे, समाधान देवराम धनगर, लिलाधर मधुकर धनगर, मनोज फकीरा धनगर या चौघांचे अर्ज दाखल आहे. तर जनरल मधून ज्ञानेश्वर दादा पाटील, ज्ञानेश्वर नथ्थु पाटील, रविंद्र काशिनाथ पाटील, मेहेरबान मनवर तडवी, ज्ञानेश्वर शालीग्राम पाटील, सुनिल बाळकृष्ण नेवे, ज्योती सुनील नेवे, संजय साहेबराव पाटील,वाणी दिलीप नेमीदास, नथ्थु रमजान तडवी असे एकूण चौतीस उमेदवारी अर्ज दाखल होते व आज दि.९ रोजी झालेल्या अर्ज छाननीत सर्वच अर्ज वैध ठरले आहे.
दि.२४ मार्च २०२२ पर्यंत मेदवारी माघारी घेण्‍याची अंतिम मुदत असून या मुदतीपर्यंत किती अर्ज माघारी होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मग त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये काही विद्यमान संचालक व आजी-माजी ग्रा.पं.सरपंच व सदस्यांचा समावेश आहे.या संस्थेची प्रत्यक्षात निवडणूक झालीच तर गावातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button