Amalner

Amalner: सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यास राहणार  बिग बॉस मराठी फेम मिनल शाह उपस्थित..

Amalner: सार्वजनिक शिवजयंती सोहळ्यास राहणार बिग बॉस मराठी फेम मिनल शाह उपस्थित..

अमळनेर येथिल अमळनेर कारांची मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने छ. शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या प्रांगणात १९ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून या सोहळ्याला मराठी बिग बॉस ची तारका मिनल शहा उपस्थित राहणार आहे.तर विविध महापुरुष, महानायिकांच्या वेशात येणाऱ्या सर्व मुलामुलींना यावेळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

अमळनेरच्या मानाची सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे दरवर्षी भव्य मिरवणूक शहरातून निघते.मात्र यंदा कोरोनाच्या नियमांच्या पार्श्वभूमीवर समितीतर्फे मिरवणूकऐवजी छ. शिवाजी महाराज नाट्यगृह येथे जागेवरच महिला,युवती आणि शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.शिव जन्माचा पाळणा यावेळी मराठी बिगबॉस स्टार मिनल शहा हिच्या हस्ते हलवण्यात येईल.तर यावेळी विविध क्षेत्रातील महिला शिवजन्माचा पाळणा गातील. तसेच शिवजन्मानिमित्त राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ,बाल शिवाजी राजे यांच्या रथासमोर यावेळी आदिवासी सुप्रसिद्ध जय बजरंगबली टिपरी डान्स पथक विविध कसरती करून आंनदोत्सव साजरा करतील. यावेळी सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कुल चे विद्यार्थी पोवाडा व नृत्य सादर करतील. खान्देश रक्षक संघटनेचे निवृत्त आर्मी मॅन सुव्यवस्था सांभाळतील तर शिजन्मोत्सवासाठी येणाऱ्या सर्व शिवभक्तांनी कोविड नियमांचे पालन करून उत्सव साजरा करावा असे आवाहन अमळनेर ची मानाची सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीतर्फे करण्यात आलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button