Amalner

अमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..!

अमळनेर: प्रा शशिकांत पाटील यांच्या शोध निंबधाला बेस्ट पेपर अवॉर्ड..!

अमळनेर तालुक्यातील मुडी येथील रहिवासी व सध्या कोकणातील खालापूर येथील विश्वनिकेतन व्यवस्थापन, उद्योजकता, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शास्त्र व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेले प्रा शशिकांत पाटील यांच्या संशोधन पेपरला बेस्ट पेपर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे.आंध्रप्रदेशातील आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित आयसीएसीईटी 2021 आंतरराष्ट्रीय परिषदेत शोध निबंध सादर केला होता. या परिषदेत देश विदेशातील अभियंते , तंत्रज्ञ , शास्त्रज्ञ ,संशोधक, प्राध्यापक व संशोधन अभ्यासक व विद्यार्थी सहभागी झाले होते. सुमारे ३०० संशोधन पेपर सादर करण्यात आले व हजारो संशोधकांनी ऑनलाईन सादरीकरण व सहभाग नोंदविला. प्रा शशिकांत पाटील यांनी ०३ संशोधन पेपर सादर केले व त्यांच्या कृत्रिम बुद्धिमत्ता तसेच न्यूरल नेटवर्कच्या साहाय्याने बिटकॉइनची किंमतची अंदाज ठरविण्यासंबंधित संशोधन लेखास संशोधन समीक्षक व तज्ज्ञ परीक्षकांनी प्रशंसनीय समीक्षेसह सर्वोत्कृष्ट पेपरची शिफारस करण्यात आली व समारोप समारंभात घोषणा करून सन्मानित करण्यात आले.

प्रा शशिकांत पाटील यांनी आतापर्यंत सुमारे ७५ शोधनिबंध राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावरील संशोधन परिषद तसेच नियतकायकालिकातुन प्रसिद्ध झाले असून ते विविध संशोधन समितींवर कार्यरत आहेत.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button