Maharashtra

सेवा शर्ती नियमावली दुरुस्ती व पेन्शन योजनेबाबत आज मुंबईला बैठक

सेवा शर्ती नियमावली दुरुस्ती व पेन्शन योजनेबाबत आज मुंबईला बैठक

नूरखान

आ.रोहित पवारांनी तातडीने आमदार अनिल पाटील यांना मुंबईला बोलावले.
एक नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना, पती-पत्नी एकत्रीकरण आणि उर्वरित शाळांना अनुदान आदी विषय महत्वाचे असून या विषयावर 28 रोजी सकाळी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत आमदार अनिल पाटील यांना घेऊन चर्चा करतो असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी भ्रमणध्वनिवरून शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना दिले.
महाराष्ट्र शासनाने एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त मात्र त्यानंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करून महाराष्ट्र राज्य सेवा शर्ती नियमावली 1981 मध्ये दुरुस्ती करून अन्यायकारक नियम लादण्याचा प्रयत्न केला असून त्या निर्णयाचा शिक्षक संघटनानी निषेध केला असून गेल्या सरकारला अजित पवार, धनंजय मुंडे आदींनी विरोध केल्याचे शिक्षक संघटनांनी निदर्शनास आणून दिले.
त्यावेळी आमदार अनिल पाटील यांनी भ्रमणध्वनिवरून थेट आ.रोहित पवार यांच्याशी बोलणे केले आ.रोहित पवार संघटना पदाधिकाऱ्यांशी बोलताना म्हणाले की 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न अवघड आहे मात्र त्यापूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांचा तांत्रिक त्रुटीतून मार्ग निघू शकतो बदल केलेल्या नियमावलीत आक्षेप घेण्याची मुदत ऑगस्ट पर्यंत आहे मात्र शासनाने याबाबत नेमलेल्या समितीला अहवाल सादर करण्याची मुदत 31 जुलै असल्याने आणि यापूर्वी विरोधी बाकावर असताना अजित पवारांनी शिक्षकांची बाजू घेतली होती त्याचा व्हिडीओ आहे आता सरकार असतांना त्याच शिक्षकांवर अन्याय का अशी भूमिका संघटना पदाधिकाऱ्यांनी मंडळी असता तातडीने अजित पवार यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असल्याने त्यांनी आमदार पाटील यांना तातडीने मुंबई बोलावले.
यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, 2005 पूर्वीच्या संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील, शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष आर.जे.पाटील, मुख्यध्यपक संघटनेचे तालुकाध्यक्ष एम.ए.पाटील, माजी अध्यक्ष पी.बी.पाटील, माजी सचिव तुषार पाटील, ओबीसी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे हर्षल पाटील, मिलिंद पाटील, अस्लमोद्दीन काझी, सुधाकर पाटील, प्राथमिक शिक्षक संघटनेचे योगेश पाटील, निवृत्ती पाटील, प्रविण पाटील, मोहम्मद शेख, दीपक वाघ आदी विविध संघटना पदाधिकारी हजर होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button