Amalner

Amalner: दारू प्यायला दिली नाही म्हणून बार मालकाला मारहाण..!

Amalner: दारू प्यायला दिली नाही म्हणून बार मालकाला मारहाण..!

अमळनेर येथील धुळे रोडवरील योगेश बियर बारचे मालकाला दारू प्यायला दिली नाही म्हणून एकाने शिवीगाळ मारहाण केली व खिशातून एक हजार रुपये बळजबरीने लुटल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, योगेश बियर बार चे मालक महेंद्र पमनदास ललवाणी रा. जुना सरकारी दवाखाना हे १ रोजी रात्री १० वाजता धुळे रोडवरील त्यांच्या योगेश बारच्या बाहेर उभे होते.त्यावेळी आर. के. नगर मधील बबलू महाराज याने क्वार्टर मागितली.पण महेंद्रने नकार दिला याचा राग येऊन बबलू महाराजने त्यास शिवीगाळ करत मारहाण केली व दमदाटी करून शर्टाच्या वरच्या खिश्यातील 1 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. मालक महेंद्र ललवाणी यांच्या दिलेल्या फिर्यादीवरून बबलू महाराजच्या विरुद्ध लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हे.कॉ.सुनील हटकर करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button