Amalner

Amalner: आवास फाउंडेशन चा हजरत गरीब नवाज पुरस्कार मानव सेवा तीर्थ यांना प्रदान…

Amalner: आवास फाउंडेशन चा हजरत गरीब नवाज पुरस्कार मानव सेवा तीर्थ यांना प्रदान…

अमळनेर : येथील सेवाभावी बहुउद्देशीय संस्था आवास फाउंडेशनच्या वतीने हजरत गरीब नवाज सन्मान पुरस्कार चोपडा येथील अमर संस्था संचलित मनाव सेवा तीर्थ यांना अमळनेर मुस्लिम इदगाह कब्रस्तान चे अध्यक्ष व मुस्लिम समाजाचे वरिष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार मास्टर यांच्या मुख्य उपस्थिती देण्यात आले.

आवास बहुउद्देशीय संस्था च्या माध्यमातून दर वर्षी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश देणारे सुफी संत हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उर्स निमित्ताने हजरत गरीब नवाज सन्मान उत्कृष्ट समाज सेवक पुरस्कार देण्यात येतो यावर्षी चोपडा तालुक्यातील वेले येथे मनाव सेवा तीर्थ ही संस्था बेवारस मनोरूग्णांचे उपचार व पुनर्वसनासाठी अतिशय चांगल्याप्रकारे काम करीत आहेत म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी सर्व बेवारस मनोरूग्णांना फळे वाटप करण्यात आली याप्रसंगी आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक शेख, उपाध्यक्ष अहेमद अली सैय्यद, सचिव नविद शेख, सदस्य जमालोद्दीन शेख,जाविदखा पठाण, इंजिनिअर इम्रान कुरैशी, उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button