Amalner

अमळनेर:लोण खु येथे 12 लोकां विरुद्ध अट्रोसिटी चा गुन्हा दाखल…

अमळनेर:लोण खु येथे 12 लोकां विरुद्ध अट्रोसिटी चा गुन्हा दाखल…

अमळनेर येथील लोण खु ह्या गावी सलग दुसऱ्या दिवशी मारहाण आणि जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध मारवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी की लोण खु येथील रहिवासी खंडेराव मगन पाटील-भिल यांना गावातील अशोक आधार पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंच पदाचा राजीनामा दिला नाही तर तुम्हाला गावात राहू देणार नाही असे बोलून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
पुन्हा रात्री १०.३० वाजता भिमराव आधार पाटील हा सोबत दिलीप आधार पाटील, समाधान गुलाब शिंदे, भूषण गुलाब पाटील, बाळासाहेब हरलाल पाटील, रविंद्र हरलाल पाटील, हर्षल रविंद्र पाटील, श्रीकृष्ण गजमल पाटील, हिरामण गजमल पाटील, हंसराज श्रीकृष्ण पाटील, किसन देवराम पाटील यांनी घरात घूसून खंडेराव यास व आई मिनाबाई मगन भिल यांना मोठमोठयाने जातीवाचक शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. व घरास आग लावून घर पेटवून दिले.त्यामुळे अशोक आधार पाटील, भिमराव आधार पाटील, दिलीप आधार पाटील, समाधान गुलाब शिंदे, भूषण गुलाब पाटील, बाळासाहेब हरलाल पाटील, रविंद्र हरलाल पाटील, हर्षल रविंद्र पाटील, श्रीकृष्ण गजमल पाटील, हिरामण गजमल पाटील, हंसराज श्रीकृष्ण पाटील, किसन देवराम पाटील यांच्याविरुद्ध भा द वि 143,149,436,452,323,504,506 व अनु सूचित जाती जमाती ऍक्ट 37 (1-3) 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास भरत गायकवाड करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button