Amalner

Amalner: मालमत्ता वादात दुसऱ्या गटाकडून तीन जणांवर गुन्हा दाखल…

Amalner: मालमत्ता वादात दुसऱ्या गटाकडून तीन जणांवर गुन्हा दाखल…

अमळनेर येथील गांधलीपुरा भागात मालमत्तेच्या वादाच्या प्रकरणा आधी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता आता दुसऱ्या गटातील रहीम तेली देखील दुसऱ्या गटातील तिघांविरुद्ध तक्रार केली असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबात सविस्तर माहिती अशी की, गांधलीपुरा भागातील रहिवासी रहीम तेली 5 रोजी सकाळी 10 वाजता आपल्या आईला भेटायला गेला होता.त्यावेळी जलाल रमजान तेली, रज्जाक रमजान तेली व अक्तर रज्जाक तेली या तिघांनी आईशी बोलत असताना जलालने रहीमचे हात पकडून ठेवले आणि रज्जाकने हातातली मिरची पूड डोळ्यात टाकली तर अक्तरने हातातील चाकूने पोटात वार केला. लगेच रज्जाकने देखील त्याच जागेवर पोटात वार केला.यानंतर उपचारसाठी रहिमला धुळे येथील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्याला एकूण 28 टाके पडले असून धुळे येथील आझाद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घेतलेल्या जबाबनुसार अमळनेर पोलीस स्टेशनला रज्जाक, जलाल, व अख्तर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button