Amalner

Amalner: राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार अमळनेर चे सुपुत्र  डॉ. भुषण प्रविण देशमुख सुप्रसिध्द अस्थिरोगतज्ञ यांना जाहीर..

Amalner: राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार अमळनेर चे सुपुत्र डॉ. भुषण प्रविण देशमुख सुप्रसिध्द अस्थिरोगतज्ञ यांना जाहीर..

भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात येणारा
“राज्यस्तरीय माणूसकी सेवा गौरव पुरस्कार” डॉ. भुषण देशमुख यांना जाहीर झाला आहे.
करोना काळात तळागाळातील रुग्णांची सेवा समाजाप्रती आशा ह्या अतुलनीय वैद्यकीय योगदानाबद्दल, हा पुरस्कार समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी व त्यांच्या निवड समितीने पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.जळगाव व नाशिक

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष श्री नरहरी झिरवळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे २६ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

अल्प परिचय डॉ. भुषण प्रविण देशमुख” हे नाशिक चे सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ असुन ते असुन घोटी, इगतपुरी, सातपूर, त्रांबाकेश्वर, अंबड लिंक रोड, पाथर्डीफाटा, मुंबई नाका… इत्यादी ठकाणी सातत्याने जाऊन त्यांनी नाशिक येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधान मंत्री जन आरोग्य योजने मार्फत अनेक रुग्णांनाना कोरोना काळात गुंतागुतीच्या शस्त्रक्रीया ,जॉइंट रिप्लेसमेंट मणक्याची शस्त्रक्रिया दुर्बीण द्वारे शस्त्रक्रिया”,डायबेटीक फूट शस्त्रक्रिया सांधेबद्दल शस्त्रक्रिया करुन उत्तम आरोग्य प्रदान केले.

कोरोना काळात त्यांनी अनेक वैयक्तिक शिबिरे भगुर, सिन्नर,निफाड सिडको, सातपूर, अमळनेर,-विप्रो , विभागात घेऊन रुग्णांची मोफत सेवा दिली व Boan maarrow density ही चाचणी मोफत करण्यात आली. शिबिराच्या माध्यमातून आलेल्या गोरगरीब रुग्णांचे *मोफत ऑपरेशन व मेडीसीन त्यांना उपलब्ध* करुन दिले.

त्यांचे वैशिष्ट म्हणजे पेशंट साठी ते दिवस रात्र सेवे साठी तत्पर असतात.
दूसरे असे की त्यांना मुंबई,आलिबाग, रेवदंडा व कोईबतूर येथील वेगवेगळ्या हाडांच्या सर्जरींचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळेच ते नाशिक येथिल अगदी कठीण बिघडलेले ऑपरेशन नव्याने परत दुरुस्त करुन त्या रुग्णाना यशस्वीरीत्या त्यांनी बरे केले. रुग्णाला आत्मविश्वास व मनोधैर्य देण्याचे काम डॉ. भुषण हे फार चांगले करुन हसत खेळत अगदी यशस्वी शस्त्रक्रिया पार पाडता म्हणुन रुग्णांचे ते चाहते आहेत.
नाशिक येथे अनेक कार्पोरेट हॉस्पीटल व जळगाव जिल्हा अमळनेर दुर्गा हॉस्पीटल मातृभूमीचे ऋण फेडण्यासाठी ते दर सोमवारी अमळनेर येथे रूग्णांना सेवा करतात.

Kg & pg hospital कोइंबतूर येथे D.N.B. करत असताना त्यांना Best Post Graduate २०२० ला हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला होता.

डॉ भूषण हे प्रा प्रवीण देशमुख यांचे सुपुत्र असून प्रा.रंजना प्रविण देशमुख तेजल biology क्लासेस च्या संचालिका असून राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीस तथा नाशिक जिल्ह्याच्या निरीक्षक आहेत. तेजस्विनी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.तर प्रा. प्रवीण देशमुख सर हे प्रताप कॉलेजचे मा. उपप्राचार्य आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button