Amalner

Amalner: अमळनेर जिल्हा आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत अमळनेर न प कर्मचारी विजेते..!

Amalner: अमळनेर जिल्हा आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत अमळनेर न प कर्मचारी विजेते..!

एरंडोल नप आयोजित जिल्हास्तरीय आंतर नगरपालिका क्रिकेट स्पर्धेत अमळनेर न प चा संघ विजेता ठरला!
स्वच्छ सुंदर वसुंधरा प्रीमियर लीग स्पर्धेत अमळनेर न प संघाने विजेतेपद प्राप्त केले! त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे!

डी डी येस पी महाविद्यालय, मैदानावर जिल्हाभरातील न प संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पाचोरा न प च्या संघास अमळनेर संघाने पराजित करून करंडक पटकावला!
कर्णधार गौतम बिऱ्हाड़े , गणेश ब्राम्हणे, रोहित कलोसे, योगेश बैसाणे विशाल बैसाणे, नितीन बिऱ्हाड़े, योगेश पवार, रिषी कलोसे, मुकेश कलोसे, रवी कलोसे, राम कलोसे, विजय सपकाळे, सागर पवार, महेंद्र बिऱ्हाड़े, श्याम करंदीकर यांचे संघाने हा इतिहास रचला!
प्रशासक तथा प्रांताधिकारी सीमा अहिरे, मुख्याधिकारी सरोदे, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलताताई साहेबराव पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आदी मान्यवरांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले!

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button