Chimur

कुणबी समाजातील महिलांनी एकत्रित येणे गरजेचे ..ज्योती ठाकरे कुणबी समाज महिला संघटनेचे विविध कार्यक्रम

कुणबी समाजातील महिलांनी एकत्रित येणे गरजेचे ..ज्योती ठाकरे
कुणबी समाज महिला संघटनेचे विविध कार्यक्रम

चिमूर प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

कुणबी समाज विविध गटागटात विखुरल्या गेले असून समाजातील अनेक महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व एकोपा निर्माण व्हावा यासाठी महिलांनी एकत्रीत येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कुणबी समाज महिला संघटना तालुका अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी केले.

कुणबी समाज महिला संघटनेच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ज्योती ठाकरे बोलत होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका उषा हिवरकर जयश्री निवटे तर डॉक्टर शोभा चाफले सीमा करारे शिल्पा ढाकुलकर अर्चना भोयर राणी थुटे अतकरे मॅडम उपस्थित होत्या.

जगात कोरोना वायरस हा दहशत करीत असताना त्यावर एका महिलेने रांगोळी चे रेखाटन केले होते
दरम्यान रांगोळी स्पर्धा व नृत्य स्पर्धा संगीत खुर्ची व उखाणे अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले रांगोळी स्पर्धेचे नियोजन सविता वडस्कर वर्षा वैद्य नर्मदा भोयर यांनी केले तर संगीत खुर्चीचे नियोजन ढाकुलकर मॅडम नीता लांडगे उरकुडे यांनी केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक मोनाली ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन हर्षा वैद्य यांनी केले
कार्यक्रमाला बहुसंख्य कुणबी महिला समाज भगिनी उपस्थित होत्या.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button