Amalner

Amalner: 17 वर्ष देशसेवा करून परतला जवान अन मुडी गावकऱ्यांनी केलं अस काही…

Amalner: 17 वर्ष देशसेवा करून परतला जवान अन मुडी गावकऱ्यांनी केलं अस काही…

ठळक मुद्दे:
सजवलेल्या वाहनातून गावात मिरवणूक काढण्यात आली.
ठिकठिकाणी सैनिकाचा सत्कार करण्यात आला.
त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

अमळनेर: मुडी येथील हिरालाल भाईदास हे भारतीय स्थल सेनेतून 31 जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. 1 फेब्रुवारीला त्यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी मिरवणूक काढून फुलांच्या वर्षाव करीत जवान हिरालाल पाटील यांचे स्वागत केले. यावेळी सैनिक हिरालाल पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबाचा सत्कार करण्यात आला.

लहानपणापासूनच देश सेवा करण्याची इच्छा असल्याने सैनिक हिरालाल पाटील यांनी परिश्रम घेतले. सन २००५ मध्ये भारतीय सेनेत भरती होऊन अहमदनगर सेंटर कॅम्प येथे प्रशिक्षण घेतले. त्यांनी जम्मू काश्मीर, दिल्ली, राजस्थान पंजाब, हरियाणा यासह अनेक ठिकाणी देशसेवा केली. १७ वर्षे देशसेवा करून घरी परतल्यानंतर गावकऱ्यांनी सैनिकाचा सन्मान केला. सत्काराच्या कार्यक्रमानंतर सजवलेल्या वाहनातून गावात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान तिरंगी झेंडा घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी सैनिकाचा सत्कार करण्यात आला. बँड पथकांनी देशभक्तीपर गितांनी गावात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले होते गावात रस्ता रांगोळीचा सजवला होता . मिरवणूकी दरम्यान, सैनिक हिरालाल पाटील यांच्यासह आई भिकुबाई भाईदास पाटील,पत्नी सोनिया पाटील व भाऊ समाधान पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात सैनिक हिरालाल पाटील यांनी युवकांना मोफत फिटनेसचे धडे देणार असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button