Amalner

अमळनेर : घरात घुसून महिलेला मारहाण..विनयभंगाचा गुन्हा दाखल…

अमळनेर : घरात घुसून महिलेला मारहाण..विनयभंगाचा गुन्हा दाखल…

अमळनेर येथील रतनदादा नगर येथील रहिवासी महिलेच्या घरात घुसून मारहाण व विनयभंग केल्याची घटना दि २० नोव्हेंबर रोजी रोजी घडली.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, रतनदादा नगर भागातील रहिवासी ३० वर्षीय महिलेच्या घरात २० नोव्हेंबर रोजी रात्री 8.30 च्या सुमारास संदीप हिरामण सूर्यवंशी, हिरामण गिरधर सूर्यवंशी, प्रदीप हिरामण सूर्यवंशी यांनी घुसून तिला मारहाण करत तिचा विनयभंग केला. सदर महिलेच्या फिर्यादीनुसार अमळनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ए एस आय विलास पाटील करीत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button