Amalner

Amalner: मामाच्या गावाला आलेल्या अल्पवयीन मुलीस नेले पळवून…

Amalner: मामाच्या गावाला आलेल्या अल्पवयीन मुलीस नेले पळवून…

अमळनेर येथे मामाच्या गावाला आलेली पुणे येथील रहिवासी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस अमळनेर शहरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की पुणे जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते.अमळनेर येथे 12 वी च्या परीक्षेसाठी सदर मुलगी आपली आई व भाऊसह मामाच्या घरी आले होते.६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने ह्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले. याबाबत पीडीत मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात तक्रार दाखल केली आहे.यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button